लोकमत विशेषयवतमाळ : रियल इस्टेट व्यवसायात अलीकडे मंदी आली असून आता यातील काही दलाल बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्रीचे व्यवहार करून सर्वसामान्यांना अक्षरश: गंडा घालत आहेत. या प्रकाराला दुय्यम निबंधक कार्यालयातूनच पाठबळ मिळत असून कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता नोंदणी केली जाते. भोसा येथील बनावट कागदपत्रावर प्लॉट विक्रीच्या प्रकरणाने याला दुजोरा मिळला आहे. भांडवलदार आणि बिल्डरांनी मोठ्याप्रमाणात ले-आऊटच्या व्यवसायात गुंतवणूक केली. त्या पाठोपाठ शहरातील जागेचे दर वाढू लागले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक यात गुतंवणूक करू लागले. याचा उलट परिणाम होऊन जागेचे दर इतके वाढले की, आता सर्वसामान्य व्यक्तीच्या अवाक्यात प्लॉटचे दर गेले आहे. त्यामुळे रियल इस्टेटच्या व्यवसायात मंदी आली. अनेक ब्रोकरच्या पोटापाण्याचा व्यवसायच धोक्यात आला. यातून बनावट कागदपत्राच्या माध्यमातून प्लॉट खरेदी-विक्री करण्याचा प्रकार पुढे आला आहे. वडगाव पोलिसांनी अशाच प्रकरणात सात आरोपींना ताब्यात घेतले आहेत. या आरोपींनी वर्धा येथील एका व्यक्तीच्या नावाने बनावट निवडणूक ओळखपत्र तयार केले. यासाठी तहसील कार्यालयातील एजंट शेख सलीस शेख हुसेन (३०) रा. डेहणकर ले-आऊट याची मदत घेतली. याच आधारावर वर्धा येथील प्रकाश नीळकंठराव कांबळे (४५) यांचे पाच प्लॉट आरोपींनी परस्पर खरेदी केले. ब्रोकर रवी राजाभाऊ सुरंकार (४८) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी याने सचिन हरिभाऊ लडके (३२) रा. भिडी आणि नंदकुमार हरिदास थोटे रा. सरूळ ता. बाभुळगाव यांचा फोटो वापरून बनावट ओळखपत्र तयार करून घेतले. त्यानंतर या प्लॉटचा तलाठ्याकडून सातबारा घेऊन सचिन लडके याने शेख महेमुद यांना प्लॉट खरेदी करून दिला. याच प्रकारे नंदकुमार थोटे याने मूळ मालक असल्याचे भासवत रवी सुरंकार याला चार प्लॉट खरेदी करून दिले. या प्रकरणात एकूण पाच प्लॉट खरेदी करण्यात आले. विशेष म्हणजे एकच व्यक्तीच्या नावने दोेन मतदार कार्ड वेगवेगळा फोटो लावून वापरण्यात आले. त्यानंतरही दुय्यम सहायक निबंधक कार्यालयाकडून खरेदीची नोंदणी करण्यता आली. यावरून दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यक्ती सुध्दा यात सहभागी असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)भोसा प्रकरणाने पितळ उघडे, सात आरोपींना अटक दुय्यम निबंधकांना दलालांचा गराडा प्रशासकीय इमारतीत असलेल्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचीच चलती आहे. थेट येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी येथे अनेक नियम आहेत. परसेंटेजच्या हव्यासातूनच बनावट कागदपत्रावरही नोंदणी केली जाते. प्रत्यक्षात मालमत्ता हस्तातरण कायदानुुसार कुठल्याही व्यवहाराची नोंदणी करण्यापूर्वी निबंधकाने मालमत्ते संदर्भातील इंडेक्स रिपोर्ट तपासणे आवश्यक आहे. त्यानंतरच कोणत्याही व्यवहाराची नोंदणी करणे अपेक्षित आहे. प्लॉटची परस्पर विक्री भोसा येथील एका सर्व्हे नंबरमध्ये असलेले पाच प्लॉट बनावट कागदपत्राच्या साहाय्याने परस्परच खरेदी केले. विशेष म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयाकडूनही व्यवहाराची कोणतीच पडताळणी करण्यात आली नाही. थेट नोंदणी होत असल्याने या गोरखधंद्याला एकप्रकारे पाठबळ मिळत आहे.
बनावट कागदपत्रावर खरेदीची नोंदणी
By admin | Updated: March 23, 2015 00:01 IST