शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दर्शविले ‘पक्षिप्रेम’

By admin | Updated: April 5, 2015 00:06 IST

पशुपक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यासाठी येथील गुरूकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसराला लागूनच असलेल्या...

मुकुटबन : पशुपक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यासाठी येथील गुरूकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसराला लागूनच असलेल्या जंगल भागात मातीचे भांडे, टाकावू प्लास्टिकचे ग्लास, डबे, झाडाला बांधून त्यात पाणी भरले आहे.दिवसेंदिवस वृक्षतोड वाढत आहे. परिणामी जंगले उजाड होत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात सतत बदल होत आहे. या बदलामुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. मानव, पशू व पक्षी यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या निष्पाप चिमुकल्या पक्ष्यांना वाढत्या उन्हामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक पशुपक्षी पाण्याविना तडफडून मरत आहे. या पक्ष्यांना वाचविण्यासाठी गुरूकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरालगतच्या जंगल भागात मातीची भांडी, टाकावू प्लास्टिकचे ग्लास, डबे, झाडाला बांधून त्यात पाणी भरून पशुपक्ष्यांची तहान भागविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.दररोज सकाळी शालेय विश्रांतीनंतर त्यात पाणी भरण्याचा उपक्रम शिक्षकांसह विद्यार्थी राबवित आहे. शिवानंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शिक्षक शैलेश उंबरकर, अविनाश कोथळे, संगिता वैद्य, विद्यार्थिनी जान्हवी गडेवार, समीक्षा कोपुलवार, कार्तिक बद्दमवार, अनिकेत खडसे, अभिलाष आगुलवार आदी या उपक्रमाला सहकार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. (शहर प्रतिनिधी)