शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या गुंतवणूकदारांची पाच कोटींनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:22 IST

अधिक व्याजाचे आमिष देऊन पुसद येथील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देअधिक व्याजाचे आमिष देऊन पुसद येथील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : अधिक व्याजाचे आमिष देऊन पुसद येथील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी निर्मल इन्फ्राहोम कार्पोरेशन लिमिटेड, छत्तीसगढच्या (एनआयसीएल) दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे आला आहे.पुसदच्या मोतीनगर भागात एनआयसीएल या कंपनीने काही वर्षापूर्वी कार्यालय उघडले. गुंतवणुकदारांच्या बैठका घेऊन त्यांना २३०० रुपये गुंतविल्यास पाच वर्षात १७ हजार रुपये देण्याचे आमिष दिले. तसेच इतर योजनांमध्ये पैसा गुंतविल्यास किती आर्थिक फायदा होतो याची माहिती दिली. या प्रलोभणाला बळी पडून अनेकांनी वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतविले. मात्र मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना पैसा परत केला नाही. तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे. या प्रकरणी पुसद तालुक्यातील धुंदी येथील जयदेव मारोती भट यांनी पुसद शहरात ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी कंपनीचे सीएमडी अभिषेक सिंग पी. आनंदसिंग चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक हरीश पी. अशोक शर्मा, संचालक फुलसिंग पी. गंगाप्रसाद चौधरी, निरंजन पी. अशोक सक्सेना, निर्मलादेवी आनंदसिंग चव्हाण, लखन गजाधीशप्रसाद सोनी, आशिष आनंदसिंग चव्हाण सर्व रा. शाजापूर (मध्यप्रदेश), एस.एस. राठोड, डी.एस. राठोड रा. चंदीगड, सारिका अ. बारस्कर रा. टिकारी जि.बैलूत (मध्यप्रदेश) आणि पी.एन. मुन्शी रा. श्रीनगर यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.यवतमाळ शहरात ढोकेश्वर मल्टीस्टेटचे प्रकरण ताजे असताना आता पुसदमध्येही गुंतवणूकदाराची फसवणूक झाल्याचे पुढे आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास आता पुसद शहर पोलिसांकडून काढून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रेमदास आडे, राजू झाडे, दीपक आसरकर, विजय पवार, सुनील बोटरे करीत आहे. आता या गुंतवणूकदारांना त्यांचे कष्टाचे पैसे कधी मिळतील याकडे लक्ष आहे.आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधानिर्मल इन्फ्राहोम कार्पोरेशनने पुसद तालुक्यात गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक केली आहे. या प्रकरणी ज्यांची फसवणूक झाली त्यांनी आपल्या जवळील कागदपत्रांसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी केले आहे.