शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

पुसद, उमरखेड, वणी येथे ‘दीपोत्सव’चे थाटात प्रकाशन

By admin | Updated: November 8, 2015 02:36 IST

यवतमाळ : महाराष्ट्रात ख्यातनाम दिवाळी अंक म्हणून गणला जाणारा ‘लोकमत’चा दिवाळी अंक ‘दीपोत्सव’ प्रकाशित झाला.

यवतमाळ : महाराष्ट्रात ख्यातनाम दिवाळी अंक म्हणून गणला जाणारा ‘लोकमत’चा दिवाळी अंक ‘दीपोत्सव’ प्रकाशित झाला. वाचनाची दर्जेदार मेजवाणी देणारा हा अंक यावर्षी आगळ्या पद्धतीने वाचकांच्या अधिक जवळ पोहोचला आहे. मोठ्या शहरांमध्येच प्रकाशनाचे समारंभ करण्याचा प्रघात बाजूला सारत थेट वणी, पुसद, उमरखेडसारख्या तालुक्याच्या शहरांमध्ये शनिवारी ‘दीपोत्सवा’चे थाटात प्रकाशन करण्यात आले.‘दीपोत्सव’ म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानवर्धक दिवाळी अंकवणी : येथील विश्रामगृहात शनिवारी सकाळी ‘लोकमत’च्या दीपोत्सवाचे थाटात प्रकाशन करण्यात आले. शनिवारी वणी येथील विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, पंचायत समितीचे सभापती सुधाकर गोरे, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर वऱ्हाटे, प्रा. होमराज पटेलपैक यांच्या हस्ते दीपोत्सवाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राजू उंबरकर यांनी ‘लोकमत’चा हा दीपोत्सव अत्यंत वाचनीय असून लहानांपासून ते थोरांपर्यंतच्या सर्वांसाठी यात भरगच्च मजकूर असल्याचे सांगितले. सोबतच ‘लोकमत’च्या सामान्य जनांसाठी असलेल्या बांधीलकीचे कौतुक केले. प्राचार्य डॉ.शंकर वऱ्हाटे यांनी ‘लोकमत’चा हा दीपोत्सव खऱ्या अर्थाने ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण असल्याचे सांगितले. या दीपोत्सवातून वाचकांना अभिरूचीपूर्ण साहित्य वाचावयास मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभापती सुधाकर गोरे यांनी ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत’ने दीपोत्सवाची निर्मिती केली असून हा अंक वाचकांची आवड निश्तिच पूर्ण करेल, अशी आशा व्यक्त केली. प्रा.होमराज पटेलपैक यांनीही विचारांना खतपाणी घालणार आहे, दीपोत्सव असल्याचे सांगितले. यावेळी वणी विभागीय ‘लोकमत’ कार्यालयातील सहकारी उपस्थित होते.