शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘ईव्हीएम व्हीव्हीपॅट’वर जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 22:40 IST

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत बचत भवनात जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्देकेंद्रनिहाय प्रात्यक्षिक : शंका दूर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत बचत भवनात जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत २६ डिसेंबरपासून जिल्ह्यात मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिक करून नागरिकांच्या मनातील शंका दूर केल्या जाणार आहे.प्रशिक्षणप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहाय्यक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मार्गदर्शक वैभव येंडे आदी उपस्थित होते. या मशीनबद्दल नागरिकांच्या मनात कोणतीही शंका उद्भवणार नाही, याची काळजी घेऊन नागरिकांच्या शंका दूर करणे गरजेचे आहे.या प्रक्रियेमध्ये संभाव्य धोके टाळण्यासाठी कोणतीही चूक होऊ देऊ नका, हा विषय संपूर्णपणे आत्मसात करून सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कर्मचारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक