शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी प्रकल्पाला पुरेसा निधी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:50 IST

तालुक्यातील टाकळी-डोल्हारी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिली.

ठळक मुद्देमंत्र्यांची ग्वाही : प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ जलसंपदा मंत्र्यांना भेटले

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील टाकळी-डोल्हारी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिली.अमरावती येथे आढावा बैठकीकरिता आले असता महाजन यांची शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीधर मोहोड यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. तालुक्यातील डोल्हारी गावाजवळ हा प्रकल्प होत असून निधीअभावी काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्प तसेच बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीचे भूसंपादन किंवा खरेदी व गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकल्पात आज ना उद्या शेती व घर जाणारच या भावनेने नागरिक, गावांचा विकास खुंटला आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्याने शेती विकता येत नाही, संपादित किंवा खरेदीही करता येत नाही. त्यामुळे गावकरी दोन्हीकडून अडकले आहे.प्रकल्पाच्या विलंबामुळे गावात राजकारण होत असून काही वेगवेगळ्या मार्गाने खोट्या तक्रारी करून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कोणत्याही तक्रारीचा विचार न करता बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीची खरेदी, बहुमताने निवडलेल्या जागेवर बुडीत गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रकल्प बळीराजा चेतना अभियानात समाविष्ट करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच प्रकल्प व बुडीत गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची हमी दिली.शिष्टमंडळात श्रीधर मोहोड, विजयाताई सांगळे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष पंडित आंबेकर, फुबगावच्या सरपंच विमल बोरकर, उपसरपंच राजेश राठोड, घनापूरच्या सरपंच जयमाला जामकर, नखेगावचे सरपंच संतोष खडसे, फुबगावचे सुशांत इंगोले, डॉ.दिलीप साव, सावकार राठोड, संजय देशमुख, मोहन राठोड, बबन पवार, नीळकंठ बोरकर, भीमराव भोयर, गजानन गाढवे, युवराज नंदागवळी, घनापूरचे निरंजन काळे, संतोष गावंडे, गोपाळ गावंडे, नखेगावचे राजू गोरडे, उदापूरचे रमेश भोयर, शरद सांगळे, उमेश पेंडेकर, दिनेश सांगळे, प्रदीप गीते, तळेगावचे सलीम भाई, अजय राठोड, प्रभूदास गावंडे आदींचा समावेश होता.