शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये पुरोगामी संघटनांतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याला या पुरोगामी संघटनांनी विरोध केला. या कायद्यामुळे संविधानाचे कलम १४, १५ व २१ चे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. नागरिकांच्या अधिकारांना तडा जात असून या कायद्याआडून देशात जाती-धर्मात भांडण लावण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप केला. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी हातात तिरंगा घेत युवकांनी घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देसीएए व एनआरसीला विरोध : राष्ट्रपतींना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहरातील सर्व पुरोगामी विचारांच्या संघटनांनी एकत्र येत सीएए, एनआरसी, एनपीआर कायदा रद्द करण्याची मागणी केली. त्यासाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले.सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याला या पुरोगामी संघटनांनी विरोध केला. या कायद्यामुळे संविधानाचे कलम १४, १५ व २१ चे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. नागरिकांच्या अधिकारांना तडा जात असून या कायद्याआडून देशात जाती-धर्मात भांडण लावण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप केला. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी हातात तिरंगा घेत युवकांनी घोषणाबाजी केली. प्रथम पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी या संघटनांना संविधान सन्मान मार्च काढण्याची परवानगी नाकारल्याने संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास सर्व संघटनांच्या सदस्यांनी तहसील प्रांगणात एकत्रित येत निषेध व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर एसडीओंमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.या संघटनांचा होता सहभागनिषेध आंदोलनात पुरोगामी युवा ब्रिगेड, गोरसेना, जिजाऊ ब्रिगेड, मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस, मुलभूत अधिकार संघर्ष समिती (मास), अहले सुन्नत खिदमत कमिटी, एसएसएफ, अलावा ग्रुप, आम्ही भारताचे लोक, यूथ विंग जमात-ए-इस्लामी हिंद, टिपू सुलतान ब्रिगेड आदींचा सहभाग होता.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी