शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकांवरील अत्याचाराचा पुसदमध्ये निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:34 IST

मुंबई येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांवर अमानुषपणे लाठीहल्ला केला. यात अनेक शिक्षक जखमी झाले.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध करीत त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : विना अनुदानित उच्च माध्यामिक कृती समितीच्या सदस्यांवर मुंबईत पोलिसांनी लाठीचार्ज केला. या हल्ल्लयाचा तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी निषेध नोंदविला.मुंबई येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांवर अमानुषपणे लाठीहल्ला केला. यात अनेक शिक्षक जखमी झाले.ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. या घटनेचा निषेध करीत त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.गेल्या १५ वर्षांपासून विनावेतन ज्ञानदानाचे कार्य विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक करीत आहे. अनुदानाच्या मागणीसाठी त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. गेल्या २२ दिवसांपासून संवैधानिक मार्गाने त्यांचा लढा सुरू आहे. याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. उलट सोमवारी शिक्षिकांवरच लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आले. ही घटना निषेधार्ह असून घटनेची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.एसडीओंना निवेदन देताना विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, पुरोगामी शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षण संघर्ष संघटना, शिक्षक महासंघ, विनाअनुदानित कृती समिती, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, एकल शिक्षक सेवा मंच, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती आदी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक