अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि सण-उत्सव आनंदात साजरे करण्यासाठी शहरातील २० गुंडांचा तडीपारीचा प्रस्ताव दंडाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे. यातील दोघांना एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.उमरखेड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून छोट्या-मोठ्या घटना घडत होत्या. त्यामुळे पोलिसांची चांगलीच कसरत होत होती. गतवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात ४२ लोकांना अटक करण्यात आली होती. पोलिसांसह नागरिकही जखमी झाले होते. सात ते आठ दिवस शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर्षी गौरी, गणपती, दुर्गोत्सव, पोळा यासह सर्व सण-उत्सव शांततेत पार पडावे, तसेच गेल्या वर्षीच्या दगडफेकीची गंभीर दखल घेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २० जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव उमरखेड उपविभागीय दंडाधिकारी स्वप्नील कापडनीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. त्यापैकी दोघांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.उमरखेडमधील शांततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहे. तडीपारी, प्रतिबंधात्मक कारवाईसह जनजागृतीवर भर दिला जात आहे. २० गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव दाखल असून ७० जणांवर विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.- एम. राज कुमारजिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ.
उमरखेडमधील २० गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:45 IST
शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि सण-उत्सव आनंदात साजरे करण्यासाठी शहरातील २० गुंडांचा तडीपारीचा प्रस्ताव दंडाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.
उमरखेडमधील २० गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव दाखल
ठळक मुद्देशहरातील २० गुंडांचा तडीपारीचा प्रस्ताव दंडाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.