शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

कोट्यवधीची मालमत्ता मातीमोल

By admin | Updated: June 29, 2015 00:19 IST

सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने लाखो रूपये खर्च करून इमारती बांधल्या.

सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने लाखो रूपये खर्च करून इमारती बांधल्या. आज या इमारतीची आणि जागेची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. असे असले तरी या मोक्याच्या जागेवर असलेल्या शासकीय इमारती खंडर झाल्या आहेत. जिल्हा मुख्यालयी अशा एक दोन नव्हे तर १० इमारती आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामधील काही इमारती सुस्थितीत आहेत. तर काही इमारती अखेरच्या घटका मोजताहेत. जनसामान्याला सेवा पुरविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहे. त्यातून सरकारी जागेवर विविध इमारती उभ्या झाल्या आहेत. विशिष्ट कालावधी नंतर इमारतीची जागा अपुरी पडते म्हणून नव्याने दुसरी इमारत बांधण्यात आली. परंतु जुन्या इमारतीचा कुठलाही उपयोग करण्यात आला नाही. या ठिकाणी मोठे कुलूप ठोकले गेले. वर्षानुवर्ष या इमारतीकडे कुणी फिरकले नाही. याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. या ठिकाणची दारे, खिडक्या, ग्रील, फरशी, टिनपत्रे आणि कवेलू चोरून नेले. परिसरात काटेरी झुडपं वाढली आहेत. या जागेवर आता चोरट्यांनी ताबा मिळविला आहे. भरदिवसा या ठिकाणी जुगार अड्डे चालतात. रात्रीच्या वेळी दारूड्यांचा धुमाकूळ असतो. सध्या या परिसराचा वापर केवळ कचरा टाकण्यासाठी होत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यवतमाळच्या पूनम चौकामध्ये जुने स्त्री रूग्णालय होते. साधारणत: एक एकरापेक्षाही अधिक जागेत त्याचे बांधकाम करण्यात आले होते. शासनाला ही जागा दान स्वरूपात मिळाली आहे. याचा वापर केवळ वैद्यकीय सेवांसाठी करण्यात यावा. अन्यथा ही जागा मूळ मालकाला परत जाईल असा हा करार आहे. यामुळे स्त्री रूग्णालयाचे स्थानांतरण झाल्यानंतर ही जागा खितपत पडली. मात्र त्याचा नव्याने वापर करण्यासाठी शल्य चिकित्सक अथवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कुठल्याही उपाययोजना प्रशासनाला सूचविल्या नाही. यातुन कोट्यवधी रूपयांची जागा बेवारस झाली आहे. येथे लाखो रूपये खर्च करून उभारलेली इमारत खंडर झाली आहे.नगरपरिषदेच्या इमारती लगत जुनी दुमजली इमारत आहे. सर्व कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थानांतरित झाले. मात्र जुन्या इमारतीचा वरचा मजला बंद अवस्थेत पडला आहे. आजपर्यंत त्याचा कुठलाही वापर नगर परिषदेने केला नाही. ही इमारत सुस्थितीत असली तरी अडगळीची ठरत आहे. दत्त चौकातील मुख्य मार्गावर असलेले टीबी रुग्णालय विस्तीर्ण जागेत व्यापाले आहे. टीबी रुग्णालय परिसरात कर्मचारी वसाहत आणि शासकीय कार्यालय आहेत. यातील टीबी रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानांतरित झाले आहे. ही इमारत सुस्थित आहे, असे असलेतरी या जागेसह इमारतीचा कुठलाही उपयोग केला जात नाही. यवतमाळ ते गोदनी मार्गावर उद्योग भवनाची इमारत होती. ही जागा अपुरी पडते म्हणून येथील कार्यालय दारव्हा मार्गावर उद्योगभवनमध्ये स्थानांतरित झाले. जुनी इमारत आज तशीच पडून आहे. वाघापूर मार्गावर कृत्रिम रेतन केंद्राची इमारत, कृषी विज्ञान केंद्रा लगतच्या कुकु टपालन केंद्राची अवस्था अशीच बिकट झाली आहे. या ठिकाणची कर्मचारी वसाहत मोडकळीस आले आहेत. या सर्व ठिकाणी दारूडे, चोरटे आणि जुगाऱ्यांचा वावर असतो.