शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती

By admin | Updated: December 2, 2014 23:14 IST

आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व वेतनश्रेणी लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समजाकल्याण विभागाला दिले आहेत.

यवतमाळ : आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व वेतनश्रेणी लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समजाकल्याण विभागाला दिले आहेत. ३० एप्रिल १९९८ च्या शासन निर्णयाने राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १२ वर्ष सेवा झाल्यानंतर कालबद्ध पदोन्नती योजना लागू केलेली आहे. त्यामुळे खासगी शाळांमधून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बारा वर्षानंतर पदोन्नतीचा लाभ मिळतो आणि पद उपलब्ध नसल्यास त्या पदाची वेतनश्रेणी मिळते. परंतु राज्यातील आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अशी कालबद्ध पदोन्नती योजना लागू करण्याबाबत कुठलाही कायदा किंवा शासन निर्णय नाही. त्यामुळे समाजकल्याण अधिकारी आणि विभागीय समाजकल्याण अधिकारी यांनी आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ नाकारला होता. त्या संदर्भात महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने आश्रमशाळांमधील लिपिक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई, कामठी, मदतनिस या पदांवर काम करणाऱ्यांना बारा वर्ष सेवेनंतर ३० एप्रिल १९९८ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती आणि वेतनश्रेणी देण्याबाबत पाठपुरावा केला होता. परंतु त्याची दखल न घेतल्याने यवतमाळ जिल्ह्यातील विजय ग्रेसपुंजे, के.एफ राठोड, जितेंद्र घाडगे यांच्यासह ४१ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अ‍ॅड.प्रदीप क्षीरसागर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होवून न्यायालयाने ३० एप्रिल १९९८ नुसार कालबद्ध पदोन्नती याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांना लागू असल्याबाबत निर्वाळा देत समाजकल्याण अधिकाऱ्यांनी ४१ याचिकाकर्त्यांच्या सेवा स्वतंत्रपणे तपासून बारा वर्ष पूर्ण झाल्यापासून सदर शासन निर्णयानुसार कालबद्ध पदोन्नती लागू करावी, असे आदेश दिले आहे. या आदेशामुळे याचिकाकर्त्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नती अथवा वेतनश्रेणी अथवा इतर लाभ मिळणार आहेत. (प्रतिनिधी)