शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

प्रकल्प भरले, शहरातील पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:00 IST

गुरूवारी दुपारी निळोना प्रकल्प ४.५ एमएम क्युब अर्थात दशलक्ष घनमिटर पाणी साठ्याने ओव्हर फ्लो झाला आहे. या ठिकाणावरून पाण्याचा मोठया प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पाच्या ओव्हर फ्लोवर चापडोह प्रकल्पाच्या साठ्याचे गणित अवलंबून आहे. सध्या या प्रकल्पात ४८ टक्के जलसाठा आहे. चापडोह प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातही पाहिजे तसा पाऊस झाला नाही. यामुळे हा प्रकल्प पाहिजे तसा भरला नाही. आता निळोना ओव्हर फ्लो झाल्याने लवकरच चापडोह प्रकल्प भरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरवासीयांची तहान भागविणारा निळोना प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. तर चापडोह प्रकल्प निम्मा भरला आहे. निळोना प्रकल्प ओव्हरफ्लो अवस्थेत सप्टेंबरपर्यंत राहला तर पुढील पावसाळ्यापर्यंतचे लागणारे पाणी सहज उपलब्ध होते. अन्यथा एप्रिल आणि मे महिन्यात इमर्जन्सी मोटरपंप प्रकल्पात सुरू करावे लागतात. यावर्षी प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने सध्यातरी यवतमाळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे वाढत्या शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.गुरूवारी दुपारी निळोना प्रकल्प ४.५ एमएम क्युब अर्थात दशलक्ष घनमिटर पाणी साठ्याने ओव्हर फ्लो झाला आहे. या ठिकाणावरून पाण्याचा मोठया प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पाच्या ओव्हर फ्लोवर चापडोह प्रकल्पाच्या साठ्याचे गणित अवलंबून आहे. सध्या या प्रकल्पात ४८ टक्के जलसाठा आहे. चापडोह प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातही पाहिजे तसा पाऊस झाला नाही. यामुळे हा प्रकल्प पाहिजे तसा भरला नाही. आता निळोना ओव्हर फ्लो झाल्याने लवकरच चापडोह प्रकल्प भरणार आहे. या दोन्ही प्रकल्पावरून शहराला पाण्याचा पुरवठा होतो. यामुळे शहरासाठी दोन्ही प्रकल्प महत्वाचे आहेत.सध्या शहराला पाच दिवसआड पाणी पुरवठा होतो. शहराचे विभाजन पाच झोनमध्ये करण्यात आले आहे. त्यानूसारच पुढील काळात पाणी पुरवठयाचे नियोजन असणार आहे. शहरातील तीन लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी ४१ हजार नळजोडण्या झाल्या आहेत. आणि आणखी नळ जोडणीचे अर्ज आले आहेत.

वार्षिक सरासरीच्या  ६१ टक्के पाऊस - जिल्ह्यात जून महिन्यात १०७ टक्के पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात पावसाने मासिक सरासरी पूर्ण केली. आतापर्यंत ६१ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.  

 

टॅग्स :DamधरणNilona Damनिळोणा धरण