शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

वणीत दूध रस्त्यावर फेकून निषेध

By admin | Updated: June 4, 2017 01:14 IST

किसान क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून...

विविध मागण्या : शेतकऱ्यांचा संपाला पाठिंबा, भाजीपाल्याची आवक घटलीलोकमत न्यूज नेटवर्कवणी : किसान क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून वणीतही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर फेकून शासनाचा तीव्र निषेध नोंदवित या संपाला जोरदार प्रतिसाद दिला.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांना पेंशन योजना लागू करावी, दूधाला योग्य भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी गुरूवारपासून राज्यातील शेतकरी एकसंघ होऊन संपांवर गेले आहेत. यात शेतकरी आपल्या भाजीपाला व दूध पुरवठा बंद करीत आहे. भाजीपाला व दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध नोंदवित आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा या संपाला वाढता पाठींबा बघून शासनाचेही चांगलेच धाबे दणाणले आहे. शनिवारी सकाळी वणीतील गांधी चौकात असंख्य दूध उत्पादक एकत्रित आले. त्यांनी विक्रीसाठी आणलेले शेकडो लीटर दूध रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध नोंदविला.या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते देवराव धांडे, गुरुदेव सेनेचे मुख्य संयोजक दिलीप भोयर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील, भाकपचे अनिल घाटे, दिलीप परचाके, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अजय धोबे, दशरथ पाटील, तेजराज बोढे, सुनिल मोहितकर, बालाजी काकडे, वामनराव मत्ते, अनंता मोहितकर, आनंद पानघाटे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सदर संप यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे. या संपात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होत आहे. वणी येथेही आजच्या आंदोलनादरम्यान, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजीपाल्याचे भाव वधारलेराज्यभर शेतकऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे वणीची बाजारपेठही प्रभावित झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून भाज्यांची आवक घटली असून दामदुपटीने भाज्यांची विक्री केली जात आहे. भाज्यांचे भाव गगणाला भिडल्याने गृहीणींचे बजेट पार विस्कळीत झाले आहे. वणीच्या भाजी बाजारात नागपूर, छिंदवाडा, संगमनेरसह वणी तालुक्यातूनही भाजीपाला येतो. मात्र बाहेर जिल्ह्यातून भाज्यांची आवक बंद झाली असल्याची माहिती वणी येथील भाज्यांचे ठोक विक्रेते राजेश महाकरकार यांनी ‘लोकमत’ला दिली.