लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी दिग्रसकरांनी निषेध मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवर एका टोळक्याने अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी येथील दीनबाई शाळेच्या प्रांगणातून दिग्रसकरांनी मोर्चा काढला. मोर्चात सर्व सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक आणि शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी होत्या. शहरातील मुख्य मार्गाने फिरून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तेथे तहसीलदार किशोर बागडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मोर्चात माजी राज्यमंत्री संजय देशमुख, नगराध्यक्ष सदफजहाँ मो. जावेद, विजयकुमार बंग, प्राचार्य आगरकर, जावेद पटेल, सतीश मेहता, रवींद्र अरगडे, अरविंद गादेकर, नवीन सेठ, दीपक वानखडे, सतीश तायडे, विवेक बनगिनवार, प्रदीप मेहता, सुरेंद्र मिश्रा, भारत पाटील, उद्धव अंबुरे यांच्यासह नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते.दरम्यान, दिवसभर शहरातील बाजारपेठ सुरळीत होती. पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.महिलांचा लक्षणीय सहभागया निषेध मोर्चात शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे, यात मुस्लीम विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. मोर्चेकऱ्यांनी विविध घोषणा दिल्या. या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.
दिग्रसमध्ये अत्याचाराविरुद्ध निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:46 IST
आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी दिग्रसकरांनी निषेध मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवर एका टोळक्याने अत्याचार केला.
दिग्रसमध्ये अत्याचाराविरुद्ध निषेध मोर्चा
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी