शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

खासगी लाईनमन चढवाल, तर मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: April 25, 2017 01:05 IST

विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी खासगी लाईनमन चढविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. मात्र, अशा घटनांमध्ये आतापर्यंत १५०० पेक्षा अधिक गरीब मुलांचा मृत्यू झाला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे : सुस्तावलेल्या महावितरणला उर्जामंत्र्यांचा ‘करंट’, वीज उपकेंद्रांचे लोकार्पण यवतमाळ : विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी खासगी लाईनमन चढविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. मात्र, अशा घटनांमध्ये आतापर्यंत १५०० पेक्षा अधिक गरीब मुलांचा मृत्यू झाला आहे. यापुढे कोणत्याही लाईनमनने खासगी लाईनमन खांबावर चढवला आणि दुर्घटना झाली, तर संबंधित लाईनमनसह शाखा अभियंता, उपअभियंत्याविरुद्ध एफआयआर नोंदवून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.सोमवारी यवतमाळसह जिल्ह्यातील विविध उपकेंद्रांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर होते. यावेळी बोलताना उर्जा मंत्र्यांनी सुस्तावलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे अनेक ‘करंट’ दिले. अनेक लाईनमन प्रकृतीमुळे, वाढत्या वयामुळे पोलवर चढू शकत नाही. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास त्यांच्या मुलांना नोकरी देणार असल्याचे सूतोवाचही बावनकुळे यांनी केले. सकाळी लोहारा एमआयडीसी येथून लोहारा, जवळा आणि रेणुकापूर येथील वीज उपकेंद्रांचे भूमिपूजन उर्जामंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महावितरणच्या येथील मुख्य कार्यालयात जिल्ह्यातील विविध उपकेंद्रांच्या लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. परंतु, हे उपकेंद्र ज्या स्थानिक आमदारांच्या मतदारसंघात आहे, त्यांच्या हस्ते तेथे लोकार्पणाचे फलक लावण्यात यावे, तसेच त्या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती अशा लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे, अशी सूचना उर्जामंत्री बावनकुळे यांनी केली. यातून लोकशाही अधिक बळकट व सर्वसमावेशक होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मेहनती आहेत. या जिल्ह्यात तुलनेने कमी धरणं असूनही २ लाख २० हजार हेक्टरमध्ये रब्बी पिके घेतली जातात. सुरळीत वीज वितरणासाठी केंद्र सरकार आता पैसे देत आहे. केंद्राने पहिल्याच वर्षी सिंचनासाठी ८५ हजार कोटी दिले. एकट्या घाटंजी तालुक्याचा विचार केला तर तेथे १११ नाले आहेत. त्यावर निट बंधारे बांधले तर हा तालुका पंजाबपेक्षा कमी राहणार नाही. जिल्ह्यातील सिंचन दुप्पट केल्याविना आम्ही पुढील वेळी मते मागायला येणार नाही. ९ लाख हेक्टर जमीन लागवडयोग्य असूनही येथे वीजपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. आज जे प्रकल्प उभे राहात आहेत, त्यातून शेतीला निश्चितच सुरळीत वीज मिळेल. येथील शेतकऱ्यांनी १५ लाख क्विंटल तूर उत्पादन केले आहे. तूर खरेदीचा पेच सोडविण्यासाठी उद्याच दिल्लीत बैठक घेणार असल्याचेही ना. अहीर म्हणाले.पालकमंत्री तथा उर्जा राज्यमंत्री मदन येरावर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारात जिल्ह्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या मिटविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. बावनकुळे यांच्या रूपाने योग्य माणूस योग्य ठिकाणी नेमण्यात आला आहे. त्यामुळे वीज समस्या लवकरच संपतील. या कार्यक्रमाला सहपालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार डॉ. अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार, आमदार राजू तोडसाम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)मोबाईल अ‍ॅप वापरा, वीज ग्राहकांना मंत्र्यांचे आवाहन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महावितरणचे सीएमडी संजीवकुमार यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक वीज ग्राहकाने तो वापरला तर अनेक समस्या सुटतील. मीटर रिडिंग वेळेवर न घेणे, बिल उशिरा मिळणे, अवाजवी बिल मिळणे अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. मात्र, महिन्याच्या ३० तारखेला ग्राहकाने स्वत:चे आपल्या वीज मिटरचा फोटो घेऊन महावितरणच्या अ‍ॅपवर टाकायचा आणि तो महावितरणला सेंड करायचा. यामुळे सरासरी वीज बिल येणारच नाही. या शिवाय ग्राहकांच्या इतर कुठल्याही तक्रारींच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे सहज निराकरण केले जणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.