शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सरकारी डॉक्टरांच्या मदतीला धावले खासगी डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू संसर्ग असलेला रुग्ण अथवा संशयित यांच्यावर उपचार करताना मेडिकल स्टाफ व डॉक्टरने पुरेपूर खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशात व जगात अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही डॉक्टरांचा नर्सेसचा चक्क मृत्यू झाला आहे. इतकी भयावह स्थिती असतानाही यवतमाळ मेडिकलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच साधने पर्याप्त नाहीत. अतिशय धोकादायक स्थितीत येथील डॉक्टर्स, नर्सेस काम करत आहेत.

ठळक मुद्देयवतमाळ ‘आयएमए’चा पुढाकार : शासकीय रुग्णालयात देणार एक हजार पीपीई कीट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकाचवेळी कोरोनाचे आठ रुग्ण सापडले आहे. अशा स्थितीत येथील डॉक्टर व नर्सेसकडे उपचार करताना आवश्यक असलेली सुरक्षा कीटच उपलब्ध नाही. या संकटाच्या काळातही पीपीई कीटचा पुरवठा हाफकिन्स महामंडळाच्या जाचक अटीत अडकला आहे. अशा स्थितीत यवतमाळ जिल्हा मेडिकल असोसिएशनने लोकवर्गणीतून कीट पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.कोरोना विषाणू संसर्ग असलेला रुग्ण अथवा संशयित यांच्यावर उपचार करताना मेडिकल स्टाफ व डॉक्टरने पुरेपूर खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशात व जगात अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही डॉक्टरांचा नर्सेसचा चक्क मृत्यू झाला आहे. इतकी भयावह स्थिती असतानाही यवतमाळ मेडिकलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच साधने पर्याप्त नाहीत. अतिशय धोकादायक स्थितीत येथील डॉक्टर्स, नर्सेस काम करत आहेत. नागपूरवरून २०० पीपीई कीट पुरविण्यात आल्या होत्या. मात्र या कीट एकवेळा वापरल्यानंतर फेकून द्याव्या लागतात. त्यामुळे मोठ्या संख्येने कीटची आवश्यकता आहे. हाफकिन्स महामंडळाकडे मेडिकल प्रशासनाने तातडीने पीपीई कीट पुरवठा करावा अशी मागणी केली. मात्र हाफकिन्सने ठरवून दिलेल्या फॉरमेटची कीट बाजारात उपलब्ध नाही त्यामुळे अजूनही पुरवठा झाला नाही. इतर कंपन्यांच्या स्टँडर्ड कीट खरेदीला हाफकिन्सने परवानगी नाकारली आहे. पैसा असूनही शासकीय यंत्रणा नियमात अडकली आहे.जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत डॉक्टरांची सुरक्षा धोक्यात आली आहे. हा गंभीर प्रकार माहीत झाल्याने यवतमाळ इंडियन मेडिकल असोसिएशनने लोकवर्गणी करून पहिल्या टप्प्यात एक हजार पीपीई कीट मेडिकल कॉलेजमध्ये भेट देण्याचा निर्णय घेतला. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी व सचिव डॉ. प्रशांत कसारे यांनी आवाहन करताच अवघ्या १२ तासात तीन लाखांची वर्गणी गोळा झाली. एका कंपनीला कीट पुरवठ्याबाबत आॅर्डरही दिली आहे.स्वयंसेवी संस्था व दात्यांनी पुढे येण्याची अपेक्षासंकटाच्या काळात अनेक संस्था व दानशूर व्यक्ती आपल्या परीने विविध प्रकारची मदत करीत आहे. याच संकटात दोन हात करणाऱ्या सरकारी डॉक्टरांना सुरक्षिततेच्या साधनांची अत्यावश्यकता आहे. डॉक्टर सुरक्षित असले तरच उद्भवलेल्या परिस्थितीशी प्रभावीपणे लढता येणार आहे. शासकीय पैसा असूनही खर्च करताना नियमांचे अडथळे येतात. अशा स्थितीत स्वयंसेवी संस्था व दानशुरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक बाबींचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. एकट्या आयएमएच्या पुढाकाराने ही गरज भागणारी नाही, हे निश्चित.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टर