शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

खासगी जाहिरातींचा बसवर ‘कब्जा’

By admin | Updated: June 15, 2015 02:39 IST

येथील आगारातील जवळपास सर्वच बससवर खासगी जाहिरातींनी आपला कब्जा केला आहे.

सुशील निकोडे वणीयेथील आगारातील जवळपास सर्वच बससवर खासगी जाहिरातींनी आपला कब्जा केला आहे. या जाहिरातींमुळे बसचे विद्रुपीकरण होत आहे. विशेष म्हणजे शासकीय जाहिरातींवरच अनेक खासगी पोस्टर लावले जात आहे.‘बसचा प्रवास-सुखी प्रवास’ हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या महामंडळाच्या बसवर आता खासगी जाहिरातदारांची नजर गेली आहे. त्यांनी आता थेट बसच्या आतमध्येच अनधिकृतपणे पोस्टर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. आगारात अशी एकही बस बघायला मिळत नाही, की ज्या बसमध्ये खासगी जाहिरात नाही. बसमधून दररोज हजारो नागरिक वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रवास करतात. एक बस जवळपास दोन ते तीन जिल्ह्यामध्ये फिरून येते. त्याचाच लाभ घेत खासगी जाहिरातदारांनी संबंधित विभागाची कोणतीही परवानगी न घेता बसमध्ये पोस्टर चिपकविण्याचे काम हाती घेतले आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. आता बियाण्यांच्या विविध कंपन्यांची जाहिरात बसमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासकीय विभागांनी बसमध्ये लावलेल्या जनहितकारी जाहिराती प्रवाशांना दिसूनच पडत नाही. काही जाहिराती तर शासकीय जाहिरातींवरच थेट प्रवाशांसमोर चिपकवल्या जातात. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसून येते. शासनाच्या विविध विभागांमार्फत शिक्षण, आरोग्य, आंतरजातीय विवाह, शिष्यवृत्ती, जनधन योजना, शौचालयाबाबत माहिती, वृक्ष योजना, बसमधील सूचना याबाबत जाहिराती लावलेल्या असतात. मात्र याच शासकीय जाहिरातींवर आता खासगी जाहिरातदारांनी आपले पोस्टर चिकविले आहे. अनेक बसमध्ये आयुर्वेदिक दवाखाना, गुप्तरोगावर इलाज, प्रेमविवाह, वशीकरण, बियाणे, मंदिर बांधकाम, गावातील खेळांचे पोस्टर, खासगी दवाखान्याच्या जाहिराती बिनधास्तपणे लावल्या जात आहे. या जाहिरातींवर संपर्कासाठी ते आपला मोबाईल नंबरही टाकून देतात. मात्र अशा जाहिराती लावण्यासाठी महामंडळ परवानगीच देत नसल्याचे सांगण्यात आले. तथापि जाहिरातदार मात्र बसमध्ये कुणीच नसल्याचा लाभ घेत बस एखाद्या फलाटावर उभी राहिली, की पोस्टर चिपकवून मोकळे होतात. अनेकदा वाहक व चालकच बसमधील पोस्टर काढून टाकतात. मात्र तरीही पुन्हा नवनवीन जाहिरातदार आपली जाहिरात लावतच असतात. आगारात बस जेव्हा वॉशिंगसाठी नेली जाते, तेव्हा बसवरील जाहिराती काढून टाकण्यात येते. मात्र आतमधील जाहिराती तशाच राहतात. या जाहिरातींमुळे अनेक शासकीय योजनांची प्रवाशांना माहिती मिळत नाही. प्रवासादरम्यान शासकीय जाहिरातींद्वारे जनजागृती व्हावी, या हेतूने बसमध्ये जनहित जाहिराती लावल्या जातात. मात्र या जाहिरातींवर आता खासगी जाहिराती लावल्याने प्रवाशांना अनेक योजनांची माहितीच मिळत नाही. त्यांना केवळ अर्धवटच माहिती मिळते. त्यामुळे शासकीय जाहिरातींचा उपयोग तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अनधिकृत जाहिरातदारांवर आता धडक कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात बसमध्ये केवळ खासगी जाहिरातींचाच बोलबाला दिसून येईल.