शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

आठ लिटर पाण्याची किंमत " १३६०

By admin | Updated: August 27, 2016 00:49 IST

गरिबांमध्ये ‘उमेद’ जागविण्यासाठी कार्य करत असलेल्या विभागाने साधलेली किमया आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावणारी आहे.

घाटंजीत घडली किमया : समिती करणार आता चौकशीघाटंजी : गरिबांमध्ये ‘उमेद’ जागविण्यासाठी कार्य करत असलेल्या विभागाने साधलेली किमया आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. आठ लिटर पाण्यासाठी तब्बल एक हजार ३६० रुपये या विभागाने मोजले आहे. मिळालेला हा आकडा तोंडी नसून माहितीच्या अधिकारात याच विभागाने सादर केलेला हा पुरावा आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत घाटंजीसह इतर काही तालुक्यात गेली काही वर्षांपासून गरीब आणि अती गरीब वर्गांसाठी कार्य केले जात आहे. या अभियानांतर्गत गरिबांचा विकास किती झाला याचा लेखाजोखा नसला तरी अभियाना राबविणाऱ्यांनी मात्र ‘चांगलाच’ विकास केला आहे. बचत गटाची निर्मिती, त्यांना शासनाच्या खर्चाने प्रशिक्षण, बचती विषयी मार्गदर्शन, बँकस्तरावर कर्ज आदी बाबींसाठी हे अभियान राबविले जात आहे. यातून लाखो रुपये खर्ची घातले जात आहे. ‘उमेद’ या नावाखाली हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाची उपलब्धी आणि झालेला खर्च या विषयीची माहिती राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे जिल्हा सचिव राजीव किसन चव्हाण यांनी मागितली. यात अभियानाची ‘फलश्रुती’ पुढे आली. विविध उपक्रमांसाठी झालेल्या खर्चाची देयके मनमानी काढण्यात आली. साध्या पावत्यांवर खर्च दाखवून बिले पास झाली. ७ फेब्रुवारी २०१६ रोजी बँकर्स व्हीजीटनिमित्त यवतमाळ येथील एका प्रतिष्ठानातून आणलेल्या एक लिटर प्रमाणे आठ बॉटल्स पाण्यासाठी तब्बल एक हजार ३६० रुपयांचे बिल काढण्यात आले. जिल्हा अभियान व्यवस्थापक अमोल देवलासी यांच्या प्रमाणपत्रावरून एवढी रक्कम उचलली गेल्याची बाब पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर १५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत प्रशिक्षणाच्या नावाखाली उपस्थिती पत्रकही भरून घेण्यात आले. पुढील तारखांचा वापर यासाठी करण्यात आला. यावरून सदर अभियान कशासाठी राबविले जात आहे. हे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)प्रशिक्षण भत्त्यामध्येही घोळग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रशिक्षण घाटंजी तालुक्यातील रसिकाश्रय या प्रशिक्षण केंद्रात दिले गेले. यातील देयकातही मोठा घोळ घातला गेला आहे. निवासी प्रशिक्षणात महिला निवासी नसतानाही त्यांच्या नावे देयके काढल्या गेली. प्रशिक्षण संपल्याच्या दिवसाचीही देयके काढली. प्रवासभत्ता देताना एका गावासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळे दर ठरविले गेले. याची कल्पना कदाचित प्रशिक्षणार्थ्यांनाही नसावी. लाखो रुपयांच्या खरेदीची बिले कच्चा कागदावर मंजूर झाली. आता याप्रकाराच्या चौकशीसाठी प्रवीण देशमुख यांच्या अध्यक्षतेत समिती नेमण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक २५ आॅगस्टला झाली. यात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी राजू चव्हाण यांनी केले आहे.