शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कामगारांचे वेतन थांबवून सफाई कंत्राटदाराचे दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

घराघरातील कचरा उचलून तो संकलन केंद्रावर टाकण्यासाठी वर्षभराचे कंत्राट देण्यात आले आहे. यासाठी नगरपरिषदेने कचरा वाहू ६२ वाहने (घंटागाड्या) व गल्लीबोळात जाण्यासाठी तीन चाकी वाहने खरेदी केली. प्रत्येक घरातील कचरा योग्य पद्धतीने कचरा संकलन केंद्रावर नेऊन प्रक्रिया करणे ही अपेक्षा आहे. त्याकरिता नगरपालिका वर्षाला चार कोटी रुपये खर्च करते.

ठळक मुद्देयवतमाळात बोजवारा : लातूरच्या संस्थेने कंत्राट विकले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहर स्वच्छतेचे कंत्राट घेताना आर्थिक वर्षात ठराविक कोटीची उलाढाल आवश्यक अशी अट नगरपरिषदेने घातली होती. ही पात्रताधारण करणाऱ्या संस्थेनेच कंत्राट घ्यावे, असे अपेक्षित आहे. मात्र आर्थिक ऐपत नसतानाही कंत्राट घेऊन अर्धवट सोडून देण्यात आले. आता पोट कंत्राटदार कामगारांचे वेतन थांबवून नगरपालिकेवर देयके काढण्यासाठी वेगळ्या प्रकारचा दबाव निर्माण करीत आहे.घराघरातील कचरा उचलून तो संकलन केंद्रावर टाकण्यासाठी वर्षभराचे कंत्राट देण्यात आले आहे. यासाठी नगरपरिषदेने कचरा वाहू ६२ वाहने (घंटागाड्या) व गल्लीबोळात जाण्यासाठी तीन चाकी वाहने खरेदी केली. प्रत्येक घरातील कचरा योग्य पद्धतीने कचरा संकलन केंद्रावर नेऊन प्रक्रिया करणे ही अपेक्षा आहे. त्याकरिता नगरपालिका वर्षाला चार कोटी रुपये खर्च करते. आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले हे कंत्राट देताना नगरपालिकेने विशेष खबरदारी घेतली. ज्या संस्थेची वार्षिक उलाढाल ही चार कोटी पेक्षा अधिक रकमेची आहे, त्याच संस्थेला निवडण्यात आले. लातूर येथील संस्थेकडे हे कंत्राट देण्यात आले. अर्थात त्यात स्थानिक पदाधिकाऱ्याची भागीदारी सर्वश्रृत आहे. तीन महिन्यातच हे कंत्राट संबंधित संस्थेने परस्पर पोट कंत्राटदाराच्या ताब्यात दिले. रेकॉर्डवर लातूरची संस्था असली तरी आता पोट कंत्राटदार कचरा उचलण्याचे काम करीत आहे. हा प्रकार नियमबाह्य असूनसुद्धा त्याला मान्यता देण्यात आली आहे. आता हाच कंत्राटदार कामगारांचे वेतन थांबवून नगरपालिकेवर दबाव आणत आहे.कोरोना महामारीचे संकट असतानाही घंटागाड्या उभ्या राहत आहेत. घरातील कचरा पावसाळ्यात अधिक काळ साठवून ठेवणे शक्य नाही. मात्र आर्थिक दिवाळखोर असलेल्यांनी कंत्राट घेतल्याने घंटागाड्यांमध्ये डिझेलची टाकण्याची सोय लागत नाही. काही नगरसेवक जनतेचा रोष नको म्हणून स्वत:च्या खर्चांनी घंटागाड्या चालवत आहे. असे असले तरी दिवाळखोर कंत्राटदाराचे पाठीराखे असल्याने त्याविरोधात पालिका प्रशासनाकडून कठोर कारवाई होताना दिसत नाही.एक-दोन महिन्याची देयके थकली म्हणून कंत्राटदार आपल्याच रोजंदारी कामगारांना कामबंद करण्यास मजबूर करतो. हा भयानक प्रकार माहीत असूनही कंत्राटदाराविरुद्ध नगरसेवकही अगतिक असल्यासारखे वागताना दिसत आहे.भल्या मोठ्या मार्जीनचे वाटेकरीया हितसंबंधांमुळेच शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सणासुदीच्या काळातही शहर स्वच्छता होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. सफाई कंत्राटामध्ये भलीमोठी मार्जीन असून त्याचे वाटेकरीही बरेच आहे. त्यामुळेच सफाई होते की नाही यापेक्षा कंत्राटदारांची देयके नियमित निघाली पाहिजे, यासाठी झटणारेच अधिक आहे.