सदाशिवराव ठाकरे : गणगोत महोत्सवाला चाहत्यांची गर्दी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गेल्या काही वर्षांमध्ये नैतिक मूल्यांचा सातत्याने ऱ्हास होताना दिसतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे, नैतिक मूल्यांची प्रत्येकाने जोपासना करावी, मूल्यांची जपणूक व्हावी, असे मनोगत माजी खासदार आणि सत्कारमूर्ती सदाशिवराव ठाकरे यांनी केले. निमित्त होते त्यांच्या ९३ वर्षातील पदार्पणाचे. माजी खासदार, भूदान चळवळीचे प्रणेते, सर्वाेदयी गांधीवादी नेते असे अनेक पदे भुषविलेले व विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेले ठाकरे काकांनी आपल्या आयुष्याचे ९२ वर्षे पूर्ण केले आणि बुधवारी ९३ वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त येथील कोल्हे सभागृहात ‘गणगोत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला व्यासपिठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, न. मा. जोशी, प्रा. रमाकांत कोलते, अॅड. आशिष देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सदाशिवराव ठाकरे पुढे म्हणाले, नैतिम मुल्यांसह चारित्र्य जपणे आवश्यक आहे. चारित्र्य जपून निष्कलंक प्रवृत्तीने जीवन जगल्यास निश्चितच दिर्घायू आयुष्य जगता येते. यावेळी इतर मान्यवरांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. सदाशिवराव ठाकरे यांच्या गणगोतांसह या कार्यक्रमाला त्यांचे हजारो चाहते उपस्थित होते. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा बँक अध्यक्ष अमन गावंडे, माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, प्राचार्य शंकराव सांगळे, अशोक घारफळकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनिष पाटील, जीवन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, डॉ. प्रा. प्रदीप राऊत आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.
नैतिक मूल्यांची जोपासना व्हावी
By admin | Updated: June 15, 2017 00:59 IST