विधानसभेची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:23 PM2019-08-10T22:23:49+5:302019-08-10T22:24:35+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्हीएमची तपासणी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी ही माहिती दिली.

Preparation of the Assembly in the final phase | विधानसभेची तयारी अंतिम टप्प्यात

विधानसभेची तयारी अंतिम टप्प्यात

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । ईव्हीएमची तपासणी, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहितेची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्हीएमची तपासणी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी ही माहिती दिली.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जारी होण्याची शक्यताही गुल्हाने यांनी वर्तविली. जिल्ह्यात कुठेही फारशी दुष्काळाची स्थिती नाही. धूळपेरणी केलेल्यांची पेरणी उलटली असली तरी त्याचे क्षेत्र अगदीच कमी आहे. टार्गेटऐवजी पात्र शेतकऱ्यांचा विचार केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटप बरेच वाढले आहे.
शेतकरी आत्महत्या नियंत्रणात आहे. तरीही सध्या होत असलेल्या आत्महत्यांमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. पाऊस पाण्यामुळे बाधित झालेल्यांच्या आवश्यकतेनुसार सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले आहे. काही भागात पिकांवर अळ्या दिसत असल्या तरी त्याचा वेळीच बंदोबस्त करण्याचे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले आहे. निवडणुकांपूर्वी बहुतांश विकास कामे मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.

शंभरावर कुमारी मातांच्या पुनर्वसनावर प्रशासनाचा भर
जिल्ह्यातील पांढरकवडा विभागात कुमारी माता हा मोठा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासनाचा फोकस सध्या कुमारी मातांवर आहे. त्यांचे पुनर्वसन, रोजगार यावर भर दिला जात आहे. विविध पद्धतीने छाननी करून सुमारे शंभर कुमारी मातांची यादी तयार करण्यात आली आहे. या जोखडातून बाहेर काढण्यासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय त्यांना निवासाची व्यवस्था, घरकूल उपलब्ध करून देऊन त्यांचे कायम पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात शंभर पैकी ३६ ते ४० कुमारी मातांच्या हाताला रोजगार देण्याचे नियोजन आहे. याशिवाय त्यांचे समूपदेशन केले जात आहे. पुन्हा कुणी कुमारी माता बनू नये म्हणून त्या परिसरातील कुटुंबांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुमारी मातांच्या प्रश्नावर प्रशासनाचे संपूर्ण लक्ष असल्याचे अजय गुल्हाने यांनी सांगितले.

Web Title: Preparation of the Assembly in the final phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.