शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिला पोलिसांना मिळणार पाच हजारांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 11:02 IST

महिला सक्षमीकरण व बेटी बचावसाठी आता महाराष्ट्र पोलीस दलानेही पुढाकार घेतला आहे. गरोदरपणात महिला पोलिसांना विशेष पोषण आहार मिळावा म्हणून खास पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

ठळक मुद्देकन्या झाल्यास आणखी पाच हजारमहिला सक्षमीकरणावर महासंचालकांचा भर

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिला सक्षमीकरण व बेटी बचावसाठी आता महाराष्ट्र पोलीस दलानेही पुढाकार घेतला आहे. गरोदरपणात महिला पोलिसांना विशेष पोषण आहार मिळावा म्हणून खास पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी २३ फेब्रुवारी रोजी या संबंधीचा आदेश जारी केला आहे. शासकीय सेवांमध्ये महिलांचे प्रमाण ३० टक्के करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार राज्य पोलीस दलात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढते आहे. पोलीस दलातील कामाची पद्धत व वेळेच्या अनियमिततेमुळे सर्व पोलिसांवर मानसिक ताण असतो. त्याचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होत असल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालाच्या विश्लेषणावरून निदर्शनास आले आहे. म्हणूनच महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.

बाळाच्या आरोग्याचा दर्जा वाढविणारमहिला पोलिसाच्या पहिल्या प्रसूतीच्या काळात तिचा व तिच्या होणाºया बाळाच्या आरोग्याचा दर्जा वाढविण्यावर भर आहे. गरोदरपणात विशेष पोषण आहार घेता यावा म्हणून पोलीस शिपाई ते निरीक्षक या पदावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस कल्याण निधीतून पाच हजारांचे विशेष पोषण आहार अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या निधीची जबाबदारी घटक प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. गरोदर काळात महिला पोलिसांना या अनुदानासाठी रितसर अर्ज करावा लागणार आहे.‘सृदृढ बालिका अनुदान’मुलगी जन्माला आल्यास बेटी बचाव अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुलींचा जन्मदर वाढविण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने तिच्या पोषणासाठीसुद्धा उपरोक्त अनुदानाव्यतिरिक्त आणखी पाच हजारांचे ‘सृदृढ बालिका अनुदान’ दिले जाणार आहे. घटक प्रमुखांनी ही रक्कमसुद्धा कल्याण निधीतून देण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस