शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

गर्भवती प्रेयसीचा गळा आवळून खून

By admin | Updated: December 24, 2015 03:01 IST

कोळंबी जंगलात पाच दिवसापूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटली असून गर्भवती असलेल्या प्रेयसीचा प्रियकराने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.

कोळंबी जंगल : क्रूरकर्मा प्रियकर गजाआड अकोलाबाजार : कोळंबी जंगलात पाच दिवसापूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटली असून गर्भवती असलेल्या प्रेयसीचा प्रियकराने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. विवाहित असलेल्या या क्रूरकर्म्या प्रियकराला वडगाव जंगल पोलिसांनी अटक केली आहे.शशीकला रामकृष्ण लोणसावळे (३०) असे मृत महिलेचे नाव असून ती पारवा पोलीस ठाण्यांतर्गत माथनी येथील रहिवासी आहे. तर वसंता सुखदेव खडके (३२) असे आरोपीचे नाव असून तोही माथनीचा रहिवासी आहे. वसंता हा विवाहित असून त्याला पत्नी व मुलगा आहे. शशीकला हिलासुद्धा एक मुलगा आहे. या दोघात गत वर्षभरापासून अनैतिक संबंध होते. त्यातच शशीकला गर्भवती झाली. वसंता विवाहित असल्याने प्रकरण अंगलट येण्याची शक्यता होती. त्यामुळे शशीकलाचा गर्भपात करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी यवतमाळला आला. परंतु पैशाअभावी गर्भपात होऊ शकला नाही. एका काळ्यापिवळी जीपने गावी जाण्यासाठी निघाले. रस्त्यात कोळंबी जंगलात ब्रम्हपुरी मंदिराजवळ सायंकाळी ६ वाजता ते थांबले. रात्रभर याच ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. परंतु आरोपी वसंताच्या मनात काही वेगळेच होते. मंदिराच्या जवळ झोपलेल्या शशीकलाचा स्कार्पने गळा आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मंदिराजवळून हा मृतदेह उचलून त्याने जंगलात नेऊन टाकला. पहाटे कारेगाव येथून आपल्या गावी पोहोचला. याबाबत कुणालाच खबर नसल्याने वसंता निश्चिंत होता. दरम्यान वडगाव जंगलचे ठाणेदार पी.पी. राऊत या प्रकरणाचा तपास करीत होते. महिलेचा फोटो गावागावात दाखविण्यात आले. त्यावेळी माथनी येथील महिला असल्याचे पुढे आले. पोलिसांनी अधिक चौकशी करीत आरोपी वसंतालाही ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसी हिसका दाखविताच त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांपुढे कथन केला. अधिक तपास जमादार डी.व्ही. ससाने करीत आहे. आरोपीला २६ डिसेंबरपर्यंत कोठडी दिली. (वार्ताहर)