शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

प्राधान्यक्रम देताना पांढरकवडा, वणी उपविभागाला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

पोलीस खात्यात सोयीची बदली मिळविण्याचा प्रयत्न होतो. त्यात कमाई असणारे ठाणे प्राधान्याने निवडले जाते. ज्यांनी शासकीय ड्यूटीव्यतिरिक्त इतर काही व्यवसाय थाटले ते एका परिघाबाहेर जाण्यास तयार होत नाहीत. असे कर्मचारी संलग्नचा आधार घेऊन चार-दोन दिवसांत आपल्या परिघात परत येतात. मात्र, पोेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या कठोर शिस्तीमुळे अशा कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. 

ठळक मुद्देपोलीस दलात बदलीचे वारे : संलग्नचा आधार घेऊन मुक्कामींचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलात सध्या प्रशासकीय  व विनंती बदल्यांचे वारे वाहत आहे. पाच वर्षे कार्यकाळ झालेल्या कर्मचाऱ्यांचा लेखाजोखा तयार करण्यात आला आहे. मात्र, संलग्नचा आधार घेऊन पाचपेक्षा अधिक वर्षे एकाच ठाण्यात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांना हलविले जाणार काय, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस खात्यात सोयीची बदली मिळविण्याचा प्रयत्न होतो. त्यात कमाई असणारे ठाणे प्राधान्याने निवडले जाते. ज्यांनी शासकीय ड्यूटीव्यतिरिक्त इतर काही व्यवसाय थाटले ते एका परिघाबाहेर जाण्यास तयार होत नाहीत. असे कर्मचारी संलग्नचा आधार घेऊन चार-दोन दिवसांत आपल्या परिघात परत येतात. मात्र, पोेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या कठोर शिस्तीमुळे अशा कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. 

या तीन ठाण्यांना पसंती 

वणी : येथील पोलीस ठाणे वरकमाईसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे अधिकारी असो की कर्मचारी त्यांची पहिली पसंती वणी पोलीस ठाण्यालाच असते. हे ठाणे मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.  यवतमाळ : यवतमाळ मुख्यालयी राहून कुटुंबासोबत दिवस काढता यावेत याकरिता संलग्नचा खटाटोप केला जातो. बरेच जण मुख्यालयी राहून आपले इतर व्यवसायही सांभाळताना दिसतात.  वाहतूक शाखा : काहींनी अनेक वर्षे वाहतूक शाखेत काढली आहेत. त्यांनी स्वत: नव्हे मात्र नातेवाइकांच्या नावाने वाहतुकीचा पूरक व्यवसायही सुरू केला आहे. काहींची ट्रान्सपोर्टिंगमध्ये गुंतवणूक आहे. 

या ठाण्यात नको रे बाबा ! 

अवधूतवाडी : जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे नोंद होणारे ठाणे म्हणून अवधूतवाडीची ओळख आहे. या ठिकाणी जुने कर्मचारी सोडण्यास तयार नाही. मात्र, नवीन कर्मचारी तेथे येण्याचे टाळतात. येथे मुक्कामी कर्मचाऱ्यांचा भरणा आहे.  बिटरगाव : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचे पाेलीस ठाणे म्हणून बिटरगाव ओळखले जाते. सोयीसुविधांचा येथे तुलनेने अभाव आहे. यवतमाळात स्थायिक झालेल्यांना या ठिकाणी जाण्याची ॲलर्जीच आहे.खंडाळा : जिल्ह्यातील दुसऱ्या टोकावर असलेले खंडाळा पोलीस ठाणे हे अनेकांना नको असते. दुर्गम भाग असल्याने येथे कुणीही जाण्यास तयार होत नाही. तेथे झालेली बदली रद्द करण्याचाच प्रयत्न केला जातो.

 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली