शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यपूर्व काळ ते कलासंस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

९ ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून जगभरात साजरा होतो. यावर्षी डाक विभागाने ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत डाक सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यात शनिवारी डाक तिकीट प्रदर्शन पार पडले. यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपर्यंतचे सर्वच तिकीट प्रसिद्ध केले आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । टपालदिनानिमित्त यवतमाळात ऐतिहासिक वारसा सांगणारे तिकीट प्रदर्शन

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डाक तिकीटांचे आकर्षण आबालवृद्ध सर्वांनाच आहे. या तिकीटांच्या माध्यमातून जगभरातील इतिहास मांडण्याचा प्रयत्न डाक विभागाने केला आहे. ऐतिहासिक घटनांना एकत्रित पाहण्याचा योग शनिवारी यवतमाळकरांना आला. निमित्त होते जागतिक टपाल दिनाचे.९ ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून जगभरात साजरा होतो. यावर्षी डाक विभागाने ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत डाक सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यात शनिवारी डाक तिकीट प्रदर्शन पार पडले. यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपर्यंतचे सर्वच तिकीट प्रसिद्ध केले आहेत. संग्राहकांनी हे तिकीट प्रदर्शनस्थळी लावले होते. यामुळे जुन्या घटनांना उजाळा मिळाला.विविध १० संग्राहकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. डाक विभागाचे कर्मचारी सुनिल रोहणकर यांच्या संग्रहाने अनेकांचे लक्ष वेधले. यामध्ये यवतमाळच्या दोन सुपूत्रांच्या छायाचित्रांचा समावेश होता. लोकनायक बापूजी अणे, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या तिकीटाचा समावेश होता. यासोबतच पारंपरिक रत्न, आभूषणे, चिन्हाच्या तिकीटही प्रदर्शनात लावल्या होत्या. पोस्टाची सर्वात प्राचीन इमारत असलेले तिकीट, स्वातंत्र्यपूर्व काळातील विविध ठिकाणाचा यामध्ये समावेश होता. नुरूद्दीन लालाणी यांनी वास्तूशिल्प, विमानाचे नानाविध मॉडेल, रेल्वेचे विविध इंजीन, डबे, नृत्य आविष्कार या विषयाच्या तिकीट प्रदर्शनात ठेवल्या होत्या. यश शाह यांनी गड, किल्ले, जुने टपाल ते अद्ययावत टपाल, प्रवीण चव्हाण यांनी कोनार्कचे सूर्यमंदिर, विविध देशातील टपाल तिकीट ठेवल्या होत्या. ललित बुबना यांनी भारतीय संत, समाज सुधारक मदर तेरेसा, झलकारीबाई, विजयालक्ष्मी पंडित, अहिल्याबाई होळकर, अण्णा भाऊ साठे, गोपाळकृष्ण गोखले यांच्यासह अनेक तिकीटचा संग्रह या ठिकाणी आणला होता.डॉ. योगेंद्र मारू यांनी चार्ली चॅप्लीन ते मधुबालापर्यंतच्या कलावंतांवर प्रसिद्ध झालेल्या तिकीट प्रदर्शनात लावल्या होत्या. मजरूह सुलतानपुरी यांच्यासह अनेक कलावंतांचे तिकीट या ठिकाणी होते. प्रा. अविनाश शिर्के यांनी भारतीय वनसंपदा, भारतीय तंत्रज्ञान, पर्यावरण जागृती, स्वातंंत्र्य आंदोलन याविषयावरचे तिकीट प्रदर्शनात ठेवले होते. यासोबत मकरंद जोगवार, भारती जानी, शुभम गंधेवार यांच्या तिकटांचे कलेक्शन या ठिकाणी होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन डाकघर अधीक्षक एम. ए. पत्की, आकाशवाणी उद्घोषक प्रमोद बाविसकर यांनी केले. यावेळी तिकीट संग्राहक डॉ. योगेश मारू होते. या प्रदर्शनात शाळकरी विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. अनेक तिकीटांचे कलेक्शन केले.राजमुद्रा, पोस्टकार्डहीया तिकीट प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्राची राजमुद्रा, महात्मा गांधीजींचे पोस्टकार्ड यासह विविध दुर्मिळ लिखाण असलेला संग्रह या ठिकाणी होता.आजोबांपासून नातवापर्यंततिकीटांचा संग्रह आजोबांनी केला. नातवंड आणि मुलांनी त्यात भर घातली, असे तिकीटही या प्रदर्शनात होते. राजेश लढ्ढा, यश शाह, राजू मुरारका यांनी या स्वरूपाचे तिकीट प्रदर्शनात ठेवले होते.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा