आॅनलाईन लोकमतयवतमाळ : विधीमंडळाची पंचायत राज समिती येत्या फेब्रुवारीत जिल्हा परिषदेत धडक देणार आहे. समितीच्या दौºयामुळे अधिकारी, कर्मचाºयांना धडकी भरली आहे.पंचायत राज समिती गेल्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्येच जिल्ह्यात येणार होती. प्रशासनाला तसे पत्रही प्राप्त झाले होते. मात्र समितीचा दौरा प्रथम लांबणीवर टाकण्यात आला. नंतर तो रद्दच करण्यात आला. काही अधिकारी, कर्मचाºयांनी त्यावेळी समितीचा दौरा रद्द करण्यासाठी मोठी धावपळ केली होती. त्याचाच परिपाक म्हणून समितीचा दौरा रद्द झाला होता, असे सांगितले जाते. आता पुन्हा येत्या फेब्रुवारीत ही समिती जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहे.पंचायत राज समितीत विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील अनेक सदस्यांचा समावेश आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधी सदस्य सहभागी आहेत. ही समिती जिल्हा परिषदेत धडकल्यानंतर विविध योजनांचा आढावा घेणार आहे. अखर्चित निधीचा लेखा-जोखा तपासणार आहे. विविध विभागातील रखडलेली कामे, योजना, निधीची तरतूद, झालेला खर्च, योजनांची गती आदींचा आढावा घेणार आहे. यामुळे सध्या जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी खर्चाची जुळवाजुळव करण्यात गुंतल्याचे चित्र आहे. तथापि समितीने अद्याप तारीख निश्चित केली नाही.
फेब्रुवारीत पीआरसी धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:17 IST