शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

घाटंजीच्या सूरजने पसरविला प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 21:56 IST

येथील सूरज अशोक हेमके या साधारण कुटुंबातील युवकाने आतापर्यंत अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पसरविण्याचे काम केले आहे.

ठळक मुद्देअनेकांना सहकार्य : सामाजिक संवेदनांची जाणीव, मित्रांच्या मदतीने गरजूंना करतो मदत

विठ्ठल कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथील सूरज अशोक हेमके या साधारण कुटुंबातील युवकाने आतापर्यंत अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पसरविण्याचे काम केले आहे.सूरजचे वडील अशोक हेमके ब्रेड विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र सूरजला सामाजिक संवेदनांची जाणीव आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत तब्बल २८ वेळा रक्तदान केले आहे. त्याने जवळपास १५० मित्रांचा गु्रप तयार केला. हा ग्रुपही रक्तदानात अग्रेसर असतो. यामुळे अपघातातील रुग्ण, सिकलसेलचे रुग्ण यांना जीवदान मिळाले. फुटपाथवरील सुमारे ६० गरिबांना सूरजने आपल्या ग्रुपच्या माध्यमातून वस्त्र पुरविले आहे. विदर्भातील जवळपास नऊ जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात उघड्यावर झोपणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप केले आहे.गेल्या एक वर्षापासून सूरज केवळ एकदाच भोजन करतो. अनेक रुग्णांना मात्र तो मोफत भोजन पुरवितो. आतापर्यंत त्याने आई, वडील नसलेल्या तसेच हालाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या २२ तरुण-तरुणींचे शुभविवाह लावून दिले आहे. त्यात वधू-वरांच्या कापडांसह भोजनाचा खर्चही स्वत:हून केला आहे. कुठलेही रक्ताचे नाते नसताना सूरज माणुसकी विसरत चाललेल्या जगात सामाजिक संवेदना जोपासत आहे. सूरज व त्याचा मित्र परिवार अनेक वृद्धांची देखभाल करून सेवा करतात.या कामात त्याला विलास पवार, जम्मू कुरेशी, शाहरूख पठाण, रवी मडावी, राजू मडावी, सागर मोहुर्ले, राजू गावंडे, प्रशांत भोयर, राहुल गायकवाड, इमरान शेख, अजय भोजवार, सुशांत निवल, राजू राठोड, अवी भोयर, शोएब खान, उमेश धुर्वे, विशाल डंभारे, सिंधू शिरपुरे, रवी भोयर, बहिणाबाई भोयर, ममता मोहिजे, सिंधू दरणे, ताई अंबुलवार आदींचे सहकार्य लाभते.अनेकांसाठी ठरला आशेचा किरणसूरजचे हे कार्य अनेकांसाठी आशेचा किरण ठरले आहे. आधुनिक काळात शेजाऱ्यांचीही कुणी विचारपूस करीत नाही. अशावेळी सूरज मात्र ओळखपाळख नसताना, रक्ताचे नाते नसताना अनेकांची आपल्या परीने सेवा करीत आहे. त्यामुळेच सूरज अनेकांच्या जीवनात प्रकाश पसरवित आहे.