शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये रस्त्यांची दुरवस्था, गुडघ्याएवढ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 17:28 IST

पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.  गावखेडे किंवा नगरातीलच नव्हे तर प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील रस्तेही खड्डेमय झालेले आहेत.

यवतमाळ, दि. 16 - पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.  गावखेडे किंवा नगरातीलच नव्हे तर प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील रस्तेही खड्डेमय झालेले आहेत. कंत्राटदारांचा बहिष्कार असल्याने हे खड्डे बुजवण्याची सोय सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नाही. यवतमाळ शहरातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी व विकास नगरपरिषदेतील भाजपा व शिवसेनेच्या वादात रखडले आहे.

अशीच काहीशी अवस्था जिल्हा परिषदेतही आहे. तेथे पदाधिकारी विरुद्ध अधिकारी असा वाद असल्याने कुणीच कुणाला सहकार्य करताना दिसत नाही. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहे. प्रमुख मार्गच नव्हे, पॉश वस्त्यांमधील रस्त्यांवरसुद्धा मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांबाबत सावधगिरीच्या सूचना देण्याची तसदीही बांधकाम खात्याकडून घेतली गेलेली नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.