राजकीय खळबळ : विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र न देणे भोवले लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र न दिल्याने पुसद नगरपरिषदेच्या पाच नगरसेवकांचे पद जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रद्द करण्यात आले. राष्ट्रवादीचे तीन व शिवसेना, भाजपाचा प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश असून यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुसद नगरपरिषदेत २९ नगरसेवक आहेत. त्यातील भाजपाच्या डॉ.रूपाली जयस्वाल, शिवसेनेच्या सीमा महाजन आणि राष्ट्रवादीच्या इंदूबाई गवळी, पंचशीला कांबळे, शेख फिरोज या पाच जणांनी २७ जूनपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत औद्योगिक अधिनियमाच्या कलम ९ नुसार त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. या पाचही जागांसाठी फेरनिवडणूक होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी दिली.
पुसदच्या पाच नगरसेवकांचे पद रद्द
By admin | Updated: July 8, 2017 00:35 IST