शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळची पूजा भेंडारकर करणार कॉमनवेल्थमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:35 IST

Yavatmal : वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर पूजा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. अंतिम वर्षाला असताना पूजाच्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नाला यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील सर्वसामान्य कुटुंबातील बीएएमएस पदवी घेतलेल्या डॉ. पूजा संजय भेंडारकर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. कॉमनवेल्थ यूथ पीस अॅम्बेसेडर नेटवर्क लंडन यांच्या माध्यमातून ५६ देशांचे संघटन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून २०२५-२०२७ या कालावधीसाठी पूजा यांची निवड झाली आहे.

वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर पूजा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. अंतिम वर्षाला असताना पूजाच्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नाला यश आले. तिने कॉमनवेल्थ सेक्रेटरिएट लंडन यांच्याकडे तीन विषयातील लेखी सादरीकरण केले. त्यापैकी मेडिकोलिगल पीस नेक्सेस याची निवड झाली. त्यानंतर पूजा हिची कठोर मुलाखत घेण्यात आली. प्रोफाईल पडताळणीपासून या प्रक्रियेची सुरुवात झाली होती. पूजाने औषधी आणि कायदा यातील आंतर समन्वय यावर सादरीकरण केले होते. यापूर्वी तिने गांधीनगर येथे गृहमंत्रालय दिल्ली यांच्या वतीने आयोजित नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटी येथील कार्यक्रमात आपली भूमिका मांडली होती.

या निवडीमुळे पूजाला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. तिच्या माध्यमातून १०० प्रशिक्षितांची चमू तयार केली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून महिला, तरुण व शालेय विद्यार्थी स्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. फेलोशिप देण्याचा अधिकार पूजाला मिळाला आहे. राष्ट्रकुल पातळीवर सहकार्य व संवाद वाढविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. २५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत मलेशिया येथे बोर्निओ इंटरनॅशनल सेंटर फॉर आर्बिट्रेशन अॅन्ड मेडिएशन हे प्रशिक्षण पूर्ण केले. यामुळे संवादाधारीत व संवेदनशील वाद निवारणाची क्षमता अधिक दृढ झाली असे डॉ. पूजा यांनी 'लोकमत'ला सांगितले. तिच्या वाटचालीत वडील संजय, आई वैजयंती यांचे मार्गदर्शनही महत्त्वपूर्ण राहिले आहे. 

डॉ. पूजा यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी

  • राष्ट्रकुल पातळीवर ठसा उमटविणारी डॉ. पूजा भेंडारकर ही यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण येथेच पूर्ण केले.
  • डा.मा.म. आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ येथून बीएएमएसची पदवी घेतली. नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली. तिची रुची कायद्याचे ज्ञान घेण्यात असल्याने तिने मुंबई येथील लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
English
हिंदी सारांश
Web Title : Yavatmal's Pooja Bhendarkar to Represent India at Commonwealth

Web Summary : Dr. Pooja Bhendarkar, from Yavatmal, selected as India's representative to the Commonwealth Youth Peace Ambassadors Network for 2025-2027. A BMS graduate, Pooja will lead initiatives focused on women, youth, and students after training in Malaysia.
टॅग्स :Yavatmalयवतमाळ