शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नगरपंचायतीचे मतदान शांततेत

By admin | Updated: November 2, 2015 01:56 IST

मारेगाव आणि झरी येथे रविवारी नगरपंचायतीसाठी उत्साहात आणि शांततेत मतदान पार पाडले. पहिल्याच निवडणुकीमुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.

अनुचित प्रकार नाही : मारेगावात ७३.८२ तर झरीत झाले ८७.३३ टक्के मतदानमारेगाव : मारेगाव आणि झरी येथे रविवारी नगरपंचायतीसाठी उत्साहात आणि शांततेत मतदान पार पाडले. पहिल्याच निवडणुकीमुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.मारेगाव येथे १७ प्रभागांतील १७ जागांसाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांनी मैदानात उडी घेतली होती. या सर्व उमेदवारांचे नशीब आता मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने त्यांच्यात उत्साह दिसून येत होता. त्यामुळे सकाळी ११ वाजतापर्यंत सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर पुन्हा मतदानाला वेग आला. मारेगावात दुपारी ३.३0 वाजतापर्यंत तब्बल ६१.३५ टक्के मतदान झाले. त्यात १ हजार ८४0 पुरूष तर १ हजार ८८८ महिला, अशा एकूण ३ हजार ७२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सर्वच केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत होती. पहिल्या निवडणुकीची नवलाई सर्वांनाच वाटत होती. विविध पक्षांचे नेते, उमेदवार, कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी बाहेर काढताना दिसत होते. मतदानासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ठाणेदार उमेश पाटील सतत मतदान केंद्रांची पाहणी करीत होते. मतदानादरम्यान कोणत्याच केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी ५.३0 पर्यंत तब्बल ७३.८२ टक्के मतदान झाले. यात २ हजार ३६0 पुरूष तर, २ हजार १२६ महिला, अशा एकूण ४ हजार ४८६ मतदारांनी मतदानाचा हक्क हक्क बजावला. या निवडणुकीसाठी दोन झोनल अधिकारी, २१ मतदान केंद्राध्यक्ष (चार राखीव) नियुक्त केले होते. याशिवाय ६३ मतदान अधिकारी (१२ राखीव) नेमण्यात आले होते. ईव्हीएम मशीन व कर्मचारी नेण्यासाठी पाच चार चाकी वाहने, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २१ पोलीस (चार राखीव) ठेवण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वणीचे उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दादाजी डोल्हारकर व तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर आहे. (तालुका प्रतिनिधी)झरीत मतदानासाठी उत्साहझरी : येथील मतदान केंद्रावर रविवारी सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून येत होती. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.दुपारी ४.३० वाजेपर्यंत ८२.३५ टक्के मतदान झाले होते. त्यात ३९५ महिला व ३९९ पुरूष, अशा एकूण ७९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी ११ वाजतापर्यंत मतदानासाठी थोडीफार गर्दी दिसून येत होती. दुपारनंतर मतदानाचा वेग थोडा कमी झाला. त्यानंतर पुन्हा सायंकाळी काही केंद्रांवर मतदारांनी हजेरी लावली होती. येथे नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने मतदारांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. झरी ही देशातील सर्वात लहान नगरपंचायत असून आदिवासीबहूल आहे. मतदारांमध्ये आदिवासी मतदारांची संख्या जादा आहे. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ८७.३३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ४३७ पुरूष तर ४०४ महिलांचा समावेश होता. प्रभाग क्रमांक सहामध्ये १०० टक्के मतदान झाले. (शहर प्रतिनिधी)