यवतमाळ : पंचायत राज व्यवस्थेमध्ये लोकशाहीचे पाळेमुळे मजबुत करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहे. मतदान प्रक्रिया राबवितांना पारदर्शकते सोबत गतीमानता आणली जाणार आहे. त्याची अंमलबजवनी ग्रामपंचायतींपासून होणार आहे. मतदानाच्या दिवशीच मतमोजनी होऊन निकाल जाहीर केला आहे. तसेच उमेदवारांना आॅनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. लोकशाही प्रणालीमधील हा अभुतपूर्व बदल असून राज्य निवडणूक आयोगाने अंमलबजावनीचे आदेश दिले आहेत.पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर होणार आहे. त्याचा पहिला टप्पा निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. वार्डचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक घेण्यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया यांनी राज्यभरातील अधिकाऱ्यांची व्हीडीओ काँफरन्सी घेतली. यात ग्रामपंचायत निवडणूक नवीन पद्धतीने घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक स्वतंत्र निवडणूक अधिकारी राहणार आहे. मतदानाच्या दिवशी पूर्णवेळ अधिकारी गावात असेल. मतदान पार पडल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये मतपेट्या जमा करण्यात येणार आहे. त्याचा दिवशी त्याच ठिकाणी मतमोजनी प्रक्रिया पारपडणार आहे. त्याच ठिकाणी निकाल जाहीर होणार आहे. या प्रक्रियेवर तहसीलदारांचे नियंत्रण असेल. तहसीलवर जिल्हा निवडणूक विभागाचे नियंत्रण असणार आहे. ही संपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे तत्काळ पोहचणार आहे. तसेच उमेदवाराची संपूर्ण माहिती लगतच्या पोलीस ठाण्यास जोडली जाणार आहे. विशेष म्हणजे कामकाज पारदर्शक आणि सर्वाधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे. (शहर वार्ताहर)
मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी
By admin | Updated: December 10, 2014 23:05 IST