शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’ला वाचविण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:22 IST

तालुक्याची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना देशोधडीला लागल्यानंतर सत्ताधारी भाजपाचे आमदार आणि जिल्हा बँक अध्यक्षांनी एकत्र बैठक घेऊन कारखाना वाचविण्याची धडपड सुरू केली आहे.

ठळक मुद्देबैठक : आमदार व जिल्हा बँक अध्यक्षात चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्याची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना देशोधडीला लागल्यानंतर सत्ताधारी भाजपाचे आमदार आणि जिल्हा बँक अध्यक्षांनी एकत्र बैठक घेऊन कारखाना वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. जिल्हा बँकेने ताबा घेतल्यानंतर आता शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे शुक्रवारी उमरखेड येथे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.येथील विश्रामगृहावर आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांची तासभर बैठक झाली. यात जिल्हा बँक व वसंत कारखाना प्रशासन यांंना सोबत घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी वसंत साखर कारखान्यावर जिल्हा बँकेने जप्ती आणली. कारखान्याची स्थावर मालमत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. गत वर्षभरापासून कारखाना बंद असून यामुळे ऊस उत्पादक आणि कामगार उद्ध्वस्त होत आहे. त्यातच जिल्हा बँकेने ताबा घेतल्याने वसंत सुरू होण्याची आशा मावळली आहे. याचा मोठा फटका उमरखेड तालुक्याला बसणार आहे. त्यामुळे वसंत साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेत शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी सांगितले. या बैठकीला उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने, माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, विलास चव्हाण, भीमराव चंद्रवंशी, अ‍ॅड. संतोष जैन, नितीन भुतडा, बळवंतराव नाईक, बालाजी वानखडे, सुभाष दिवेकर, कामगार नेते पी.के. मुडे, व्ही.एम. पतंगराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना