शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस, विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:42 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिन सोहळा : पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर आदी उपस्थित होते.आदर्श तलाठी पुरस्कारप्राप्त एम.एन. चवरे, आंतरिक सुरक्षा सेवा पदकप्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत निवड झालेले अंश प्रवीण इंगळे, प्रवीण देमा अंबुरे, शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविणारे सिध्दी विश्वेश्वर वानखेडे, आर्यन रविकिरण इडातकर यांच्यासह पाटंबधारे विभागाचे अशोक जयसिंगपुरे, जिल्हास्तर युवा पुरस्कारप्राप्त शुभम बैस, शिवाणी अवगण आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागात महापुराचा प्रलय नागरिकांना वेदना देऊन गेला. संकटाच्या या काळात राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पूरग्रस्त बांधवाच्या मदतीकरिता अनेक सामाजिक संघटना व नागरिक समोर आले आहे. यवतमाळकरांनीही या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता मदतीचा हात समोर करावा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.यावेळी पूरग्रस्तांना मदत म्हणून नीलिमा वानखेडे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश, राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि महसूल कर्मचारी संघटना यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्ह्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. संचालन चंद्रबोधी घायवटे आणि ललिता जतकर यांनी केले.जिल्हा पोलीस अधीक्षक राज कुमार यांचा गुणगौरवजिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना सन २०१७ व २०१८ या सलग दोन वर्षे शौर्य पदक मिळाले. आयपीएस संवर्गात एकाच अधिकाऱ्याला सलग दोन वर्ष शौर्य पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ना.मदन येरावार यांनी सांगितले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनMadan Yerawarमदन येरावार