शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याला लाॅकअप नसल्याने आमचा आरोपी तुमच्याकडे ठेवणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

दुसऱ्या पोलीस ठाण्यात आरोपी लाॅकअप करताना तेही पूर्णपणे जबाबदारी घेण्यास तयार नसतात. तेथे आरोपी ठेवण्यासाठी स्वत:च्या ठाण्यातील कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागते. दुसऱ्याच्या लाॅकअपमध्ये आरोपी ठेवला तरी जबाबदारी स्वत:वरच असते. त्यामुळे अनेक अडचणी येतात. ठाण्यात स्वतंत्र व सुरक्षित लाॅकअप रूम असावी, यासाठी वारंवार मागणी केली जाते. आता काही पोलीस ठाण्यात लाॅकअपचे बांधकाम सुरू आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या बहुतांश इमारती इंग्रजकालीन आहेत. मागील काही वर्षात नव्या इमारती पोलीस ठाण्यांना मिळाल्या. मात्र, अजूनही सात पोलीस ठाण्यांमध्ये लाॅकअपची व्यवस्था नाही. आरोपी पकडून आणल्यानंतर त्याला ठेवायचे कुठे व कसे, हा प्रश्न कायम असतो. बऱ्याचदा आरोपी स्वत:लाच इजा करून घेतो व न्यायालयात पोलिसांवर मारहाणीचे आरोप करतो. त्यामुळे पोलीस कर्मचारी, अधिकारी कायम तणावात असतात. दुसऱ्या पोलीस ठाण्यात आरोपी लाॅकअप करताना तेही पूर्णपणे जबाबदारी घेण्यास तयार नसतात. तेथे आरोपी ठेवण्यासाठी स्वत:च्या ठाण्यातील कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागते. दुसऱ्याच्या लाॅकअपमध्ये आरोपी ठेवला तरी जबाबदारी स्वत:वरच असते. त्यामुळे अनेक अडचणी येतात. ठाण्यात स्वतंत्र व सुरक्षित लाॅकअप रूम असावी, यासाठी वारंवार मागणी केली जाते. आता काही पोलीस ठाण्यात लाॅकअपचे बांधकाम सुरू आहे. 

वाहतूक खर्च वाढतो, जबाबदारीही वाढते

दुर्गम भागातील काही पोलीस ठाण्यांच्या इमारती जीर्ण आहेत. तेथे आरोपी ठेवणे धोक्याचे आहे. तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. बऱ्याचदा न्यायालयीन प्रक्रिया उशिरा पूर्ण होते. अशा स्थितीत आरोपींना तेव्हाच लाॅकअपसाठी दुसरीकडे न्यावे लागते.लाॅकअप नसलेल्या ठाण्यातील एक कर्मचारी लाॅकअपच्या ठाण्यात कर्तव्यावर ठेवावा लागतो. बऱ्याचदा लाॅकअप करताना संबंधित ठाण्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना विनवणी करावी लागते. आरोपीची जबाबदारी असल्याने अडचण होते.

नवीन बांधकामाचे प्रस्ताव शासनाकडेउमरखेड पोलीस ठाणे व वसाहतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तेथे सध्या आरोपी ठेवण्याची व्यवस्था नाही. याशिवाय ज्या पोलीस ठाण्यांमध्ये अशी सुविधा नाही. त्यांच्यासाठी लगतच्या ठाण्यातच व्यवस्था केली आहे. सध्या तरी याला दुसरा पर्याय नाही. वणी, दारव्हा, दिग्रस व पोलीस मुख्यालयात बांधकाम प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. निधी मंजूर झाल्यानंतर हे काम होणार आहे. त्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. इमारत बांधकाम गरजेचे झाले आहे.- डाॅ. दिलीप पाटील भुजबळपोलीस अधीक्षक, यवतमाळ

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे