शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात शिक्षणाधिका-यांना मारहाण, अंगावर शाई फेकली, सहा जणांविरुद्ध पोलिसात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 20:21 IST

वणीतील विद्यार्थ्यांना अकराव्या वर्गात प्रवेश न दिल्याच्या वादातून गुरुवारी सायंकाळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांना मारहाण करण्यात आली.

यवतमाळ : वणीतील विद्यार्थ्यांना अकराव्या वर्गात प्रवेश न दिल्याच्या वादातून गुरुवारी सायंकाळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांना मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांच्या चेहºयावर शाईसुद्धा फेकण्यात आली. चिंतामन वंजारी यांना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. दरम्यान या प्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्यात संघटनेच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. वृत्तलिहिस्तोवर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. वणी येथील ३१ विद्यार्थी अकरावी विज्ञान प्रवेशापासून वंचित राहिले. त्यांना प्रवेश मिळावा यासाठी  ‘लढा विद्यार्थ्यांचा-शिक्षणाच्या हक्काचा’ या संघटनेचे प्रमुख स्वप्नील धुर्वे यांनी संघर्ष चालविला. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदने, उपोषणेही केली गेली. मात्र पदरी निराशाच पडली. गुरुवारी संघटनेचे कार्यकर्ते शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांच्या भेटीसाठी यवतमाळात आले होते. परंतु शिक्षण विभागाचा गोधनी रोडवरील विद्यालयात कॅम्प सुरू होता. वारंवार संपर्क करूनही भेट न झाल्याने अखेर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हे कार्यकर्ते कॅम्पमध्ये पोहोचले. तेथे चर्चे दरम्यान वंजारी यांना मारहाण झाली. एका कार्यकर्त्याच्या हातातील कडे डोक्याला लागल्याने जखम झाल्याचे सांगितले जाते. यावेळी कार्यकर्त्यांनी वंजारी यांच्या चेहºयावर शाईही फेकली. शिक्षणाधिकाºयावरील या हल्ल्याने जिल्हा परिषद व शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. कोटसंचमान्यता दुरुस्ती शिबिर आटोपल्यानंतर दबा धरुन असलेल्या गुंडांंनी माझ्यावर हल्ला केला. पाच ते सहा जण दारू पिलेल्या अवस्थेत मारहाण करण्यासाठीच आले होते. - चिंतामन वंजारीशिक्षणाधिकारी (माध्यमिक), यवतमाळ