शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

पोलीस चौकीतूनच मोबाईल लंपास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:46 IST

जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेकरिता पोलीस चौकी थाटून कर्मचारी तैनात करण्यात आले.

यवतमाळ बसस्थानक : लक्तरे वेशीवर लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेकरिता पोलीस चौकी थाटून कर्मचारी तैनात करण्यात आले. परंतु चोरट्यांनी चक्क पोलीस अधिकाऱ्यांनाच हिसका दाखविल्याचा प्रकार सोमवारी रात्री ७.३० वाजता घडला. चोरट्याने पोलीस चौकीत तैनात सहायक पोलीस निरीक्षकाचा मोबाईल लंपास करून पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरेच वेशीवर टांगली आहेत. पोलीस मुख्यालयात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक दिलीप रामा मसराम हे सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास बसस्थानकातील वाहतूक पोलीस चौकीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेजची तपासणी करीत होते. तपासणी करताना त्यांनी आपला मोबाईल लगतच्या खिडकीत ठेवला होता. ते कामात मग्न असल्याची संधी साधून चोरट्याने हात साफ केला. चोरट्याने त्यांचा मोबाईल लंपास केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांची प्रचंड त्रेधातिरपीट उडाली. पोलिसांनी लगेच बसस्थानक परिसरात चोरट्याची शोधाशोध केली. मात्र चोरटा गवसलाच नाही. अखेर एपीआय मसराम यांनी वडगाव रोड ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बसस्थानकावर गुन्हे घडू नये, बॅग लिफ्टर, पाकीटमार हेरता यावे यासाठी पोलीस तैनात असतात. मात्र पोलीसच चोरट्यांचे शिकार झाल्याने प्रवाशांनी आपल्या सुरक्षेसाठी कुणाकडे पहावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.