गुरूवारपासून प्रक्रिया : अधिकाऱ्यांमध्येही उत्सुकतालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता बदल्यांचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातंर्गत बदली प्रक्रियेची सुरूवात कर्मचाऱ्यांपासून केली जाणार आहे. त्यासाठी १८ ते २४ मे असा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानंतर कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त यादी आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या यादीनुसार बदल्या करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन ठाणेदारांना जिल्ह्याबाहेर गेले आहेत. वडगाव रोड ठाणेदार देविदास ढोले यांची पदोन्नतीवर, जिल्हा विशेष शाखेतील बावीस्कर आणि वाहतूक शाखेतील दिलीप चव्हाण यांनी बदली झाली आहे. या पैकी दोन जागा रिक्त आहेत. तर दिलीप चव्हाण अद्याप कार्यरत आहे. लवकरच तेही येथून कार्यमुक्त होती. त्यामुळे या रिक्त जागेसाठी कोण नवीन ठाणेदार येतात, याकडे लक्ष लागले आहे. ठाणेदारांच्या जिल्हातंर्गत बदल्याही होणार आहेत. तसेच दुय्यम अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेचा कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया २० मेपासून करण्यात येईल असे सांगण्यात आले.जिल्हा पोलीस दलाचा परफॉर्मन्स वाढविण्यामध्ये बदली प्रक्रिया महत्वाचा घटक आहे. प्रशासकीय दृष्ट्या पकड ठेवण्यासाठी योग्य व्यक्ती योग्य जागेवर बसविणे आवश्यक असते. प्रत्येकाची क्षमता आणि अनुभव पाहुन बदल्या झाल्यातर खऱ्या अर्थाने कामकाजाचा दर्जाही उंचवतो. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार प्रक्रिया कोणत्या पध्दतीने पारपाडतात याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये उत्सूकता आहे. ‘मुक्कामीं’वर लक्ष जिल्हा मुख्यालयी अनेक वर्षापासून जी हुजरी करत दिवस काढणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी कोणता निकष लावण्यात येतो, याकडे इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे. मुख्यालयी मुक्कामी असलेल्या सेवकांची बदली होते की, त्यांना तिथे सोयीच्या ठिकाणी अदली-बदली करून ठेवण्यात येते. याची चर्चा सध्या रंगत आहे.
पोलिसांना लागले बदल्यांचे वेध
By admin | Updated: May 16, 2017 01:26 IST