शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धनदांडगा सावकार चक्क चोरट्या मालाचा खरेदीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 22:13 IST

यवतमाळ पोलिसांकडून सावकाराला अटक; बचावासाठी मनोरुग्ण असल्याचे सोंग

यवतमाळ : शहरातील धनदांडगा सावकारच चोरीतील मालाचा खरेदीदार निघाला. एका भंगार व्यावसायिकासोबत संधान साधून या धनदांडग्या सावकाराने कवडीमोल भावात चोरीतील लॅपटॉप व घड्याळ खरेदी केले. हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने सांगितला. आता हा सावकार मानसिक रुग्ण असल्याचे सोंग करून गुन्ह्यातून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकृत सावकारीचा परवाना असलेल्या धनदांडग्याने थेट चोरीचा मुद्देमाल घ्यावा हे पोलिसांसाठीही धक्कादायक आहे. हरिभाऊ गजानन बजाज उर्फ मुन्ना बजाज रा. कॉटनमार्केट जवळ धामणगाव रोड असे या सावकाराचे नाव आहे. कोट्यवधी रुपयाची संपत्ती असूनही तो चोरी करण्यात आलेली घड्याळे, लॅपटॉप खरेदी करायचा. आता या सावकाराला पोलिसांनी चोरट्यांच्या कबुली जबाबावरून रेकॉर्डवर घेतले आहे. भक्कम पुरावा मिळाल्याने प्रतिष्ठीत म्हणून वावरणारा हा धनदांडगा सावकार अप्रत्यक्षरीत्या घरफोडीला प्रोत्साहन देत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शहरातील मार्इंदे चौकात परिसरात बँक व्यवस्थापक हर्षल महाबुदे यांच्याकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने छडा लावला. यात अभिषेक गुंजाळ (१९) रा. साईमंदिर व शिंदे प्लॉट परिसरातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली. या दोन चोरट्यांनी पाच हजार रुपयात चोरीतील लॅपटॉप, घड्याळ, मोबाईल भंगार व्यावसायिक मुजाहिद शेख मेहमूद शेख रा. अशोकनगर पाटीपुरा याला विकल्याचे सांगितले. त्यावरून भंगार व्यावसायिक मुजाहिद शेख याला पोलिसांनी अटक केली. चोरीच्या मुद्देमालातील लॅपटॉप व घड्याळ सावकार हरिओम बजाज याला विकल्याचे त्याने सांगितले. तर मोबाईल मनीष वड्डे याला विकला. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल घेणाºया भंगार व्यावसायिकासह तिघांनाही ताब्यात घेतले. ही घटना अवधूतवाडी ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी पाचही आरोपींना त्यांच्या ताब्यात दिले. सोने खरेदीदार कोण?दरदिवशी होणाऱ्या चोऱ्या-घरफोड्यांमधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे नेमके खरेदीदार कोण याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. अनेकदा त्यांची नावे निष्पन्न होऊनही पोलीस त्यांना साक्षीदार बनवून सुरक्षा कवच प्रदान करतात. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून मोठे ‘डिलिंग’ केले जाते. त्यांना ४११ लावणे टाळले जाते.