शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनावरून पोलीस व महसूल पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:42 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अर्जुना येथे महामार्गात येणाऱ्या घरांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली आहे. भूसंपादनात केवळ एक घर शिल्लक असल्याने तेथे ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल व पोलीस पथकावर एकाच कुटुंबातील तिघांनी हल्ला केला.

ठळक मुद्देअर्जुना येथील घटना : ठाणेदार व दोन महिला पोलीस जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अर्जुना येथे महामार्गात येणाऱ्या घरांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली आहे. भूसंपादनात केवळ एक घर शिल्लक असल्याने तेथे ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल व पोलीस पथकावर एकाच कुटुंबातील तिघांनी हल्ला केला. यात ठाणेदारासह दोन महिला पोलीस जखमी झाल्या. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजता घडली.भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही अर्जुना येथील रवींद्र गोकुलप्रसाद जयस्वाल यांनी त्यांचे राहते घर रिकामे केले नाही. या जागेचा ताबा घेण्यासाठी नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक अर्जुना येथे पोहोचले. यावेळी रवींद्र गोकुलप्रसाद जयस्वाल, नीता रवींद्र जयस्वाल व रोशन रवींद्र जयस्वाल यांची महसूल कर्मचाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. घराचा मोबदला योग्य मिळाला नसल्याचा आक्षेप जयस्वाल कुटुंबियांनी घेतला. पथकातील कर्मचारी समजूत काढत असतानाच नीता जयस्वाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला. महिला पोलीस शिपाई शीला खडसे व आशा नाईक या दोघींवर हल्ला केला. तसेच इतर कर्मचाºयांवर दगडफेक सुरू केली.यातील विटेचा तुकडा पोलीस निरीक्षक दीपक पवार यांना लागला. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत तिघांनाही ताब्यात घेतले. वाहनात डांबून त्यांना ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांनी जयस्वाल कुटुंबीयांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून हल्ला केल्याची तक्रार दिली. तसेच जखमी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनही तिघांविरुद्ध तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणात कोणतीही नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात घेण्यात आली नव्हती. मात्र आरोपींच्या अटकेसाठी न्यायालयाकडे रीतसर परवानगीचा अर्ज ग्रामीण पोलिसांनी केला होता.काही काळ तणावभूसंपादनासाठी अर्जुना येथे केवळ एकाच घराचा अडथळा आहे. तो समजुतीने दूर करण्यासाठी गेलेल्या पथकांसोबत वाद झाला यामुळे घटनेला वेगळे वळण मिळाले.

टॅग्स :PoliceपोलिसNational Highwayराष्ट्रीय महामार्ग