शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:05 IST

गुन्हेगारीपूरक अवैध धंदे बंद करण्यावर पोलीस भर देत असून ज्या व्यवसायातून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते, ते अवैध धंदेवाले पोलिसांच्या हिट लिस्टवर असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देएम. राज कुमार : अवैध दारू गुत्तेदार हिटलिस्टवर

सुरेंद्र राऊत।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : गुन्हेगारीपूरक अवैध धंदे बंद करण्यावर पोलीस भर देत असून ज्या व्यवसायातून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते, ते अवैध धंदेवाले पोलिसांच्या हिट लिस्टवर असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गुन्हेगारीचा पूर्णत: बिमोड करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या यवतमाळ शहरात कुठलीच दहशत नसून गेल्या दोन महिन्यात शहरात पाच खून झाले. त्यातील तीन खून गुन्हेगारांचे, तर दोन अनैतिक संबंधातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व घटनांतील आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे पोलिसांचे गुन्हेगारी व गुन्हेगारांवर पूर्ण नियंत्रण असून गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सण-उत्सवाच्या बंदोबस्तासोबत हा प्लॅन राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात जानेवारी-फेब्रुवारी या कालावधीत अवैध दारू गुत्त्यांवर ८१९ धाडी टाकून तब्बल एक कोटी तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अंमली पदार्थ प्रतिबंधक कारवाईमध्ये चार प्रकरणात पाच लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दारूबंदी कायदा ६५ ई (फ) मध्ये अवैध दारू व्यावसायिकाला न्यायालयात शिक्षा होईल, अशा स्वरूपाच्या ‘मॉडेल केस’ करण्याचे निर्देश एम. राज कुमार यांनी ठाणेदारांना दिले. अवैध दारू, अंमली पदार्थ या भोवतीच गुन्हेगारांचे वर्तुळ आहे. हे वर्तुळ भेदण्यासाठी मुळावरच घाव घातला जात असल्याचे त्यांनी सांगितले.शहरात गांजाचा नशा करणाºयांवरही कारवाई केली जात आहे. शिवाय शहरातील गुन्हेगारीला पोसणाºया गोवंश तस्करीवरही चाप बसविला गेला. पांढरकवडा उपविभागातील तेलंगणा सीमेलगतचे रस्ते सील केले आहेत. यामुळे आता यवतमाळमार्गे गोवंश तस्करी होत असल्याचे काही प्रकरणावरून दिसून आले. त्यामुळे येथेही धडक कारवाई सुरू असल्याने हा मार्ग बंद झाल्याचा दावा त्यांनी केला.दोन गुडांना केले तडीपारकुख्यात गुंड अमित यादव याला दोन वर्ष, तर विलास पारधी याला एक वर्षासाठी तडीपार केले गेले. शहरासह जिल्ह्यातील ७५ गुन्हेगारांची यादी तयार असून लवकरच त्यांच्यावर एमपीडीएचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी ठाणेदारांना दिले. काही ठिकाणी चेनस्नॅचिंगसारख्या घटना घडल्या. यातीलही बहुतांश गुन्हे उघडकीस आले. पोलीस असल्याची बतावणी करून ठगणारी ‘इराणी गँग’ आमच्या रडारवर असल्याचे त्यांनी सांगितले. यात श्रीरामपूर-पुसदचा आरोपी दिल्ली पोलिसांनी अटक केला आहे. त्याला यवतमाळ पोलीस ताब्यात घेणार आहे.अवैध सावकारांवरही करडी नजरअवैध सावकारीच्या नियंत्रणासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी पोलीस समन्वय ठेवून आहेत. पक्की तक्रार मिळाल्यानंतर अशा सावकारांचाही पोलीस कायदेशीर बंदोबस्त करण्यास सज्ज आहे. जिल्ह्यातील अशा अवैध सावकारांची यादी तयार केली जात आहे. नजीकच्या काळात याबाबत ठोस कारवाई झाल्याचे दिसून येईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.