शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

भूखंड घोटाळ्याचा तपास दोषारोपपत्रांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:25 PM

कोट्यवधी रुपयांच्या भूखंड खरेदी घोटाळ्यात दोन आरोपी अद्याप फरार असले तरी पोलिसांचा तपास दोषारोपपत्रापर्यंत पोहोचला आहे. सर्वात आधी दाखल झालेल्या यवतमाळ शहरच्या एका गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देएका गुन्ह्यात चार्जशिट दाखल : इतर गुन्ह्यांमध्ये छाननी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधी रुपयांच्या भूखंड खरेदी घोटाळ्यात दोन आरोपी अद्याप फरार असले तरी पोलिसांचा तपास दोषारोपपत्रापर्यंत पोहोचला आहे. सर्वात आधी दाखल झालेल्या यवतमाळ शहरच्या एका गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तर अन्य गुन्ह्यातील दोषारोपपत्रांची उपविभागीय पोलीस अधिकारी व नंतर अपर पोलीस अधीक्षकांमार्फत छाननी केली जाणार आहे.यवतमाळातील भूखंड घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यात आतापर्यंत सात गुन्हे दाखल होऊन १३ आरोपींना अटक झाली. दोन आरोपी अद्यापही पोलिसांना हुलकावण्या देत आहे. अटकेतील १३ पैकी १० आरोपी अद्यापही जामीन न मिळाल्याने कारागृहात आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आता ९० दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. एका गुन्ह्यात ते दाखल झाले. तर अन्य सहा गुन्ह्यांमधील दोषारोपपत्र बनविणे अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसात ही दोषारोपपत्रे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुखाकडे छाननीसाठी पाठविले जाणार आहे. तेथून ते अपर अधीक्षकांकडे जाईल. या दोषारोपपत्रात कोणत्याही त्रुट्या राहू नये यासाठी ही छाननी केली जाणार आहे. अटकेतील आरोपींना या गुन्ह्यांमध्ये शिक्षाच व्हावी, ते निर्दोष सुटू नये या दृष्टीने कायदेशीररीत्या भक्कम चार्जशिट बनविली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.यवतमाळातील बेवारस भूखंड बनावट मालक व कागदपत्रांच्या आधारे परस्पर नावावर करून घेऊन नंतर हेच भूखंड बँकांना गहाण ठेऊन कर्ज उचलले गेले. या पद्धतीने भूखंड घोटाळा करताना अनेकांचे भूखंड हडपले गेले. बँकांच्या विशिष्ट साखळीतून या भूखंडांवर कोट्यवधींचे कर्ज दिले गेले. या कर्जात त्या बँका अडचणीत आल्या आहेत. कर्जाची रक्कम वसूल होण्याची चिन्हे नाहीत. तर या वादग्रस्त प्रकरणातील भूखंड मूळ मालकांनी ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत.अनेक बँकांची भूखंडांशी संबंधित आणखी काही प्रकरणे अद्याप रेकॉर्डवर आलेली नसली तरी त्याची चर्चा मात्र उघडपणे होऊ लागली आहे. त्या प्रकरणांचासुद्धा पर्दाफाश होण्याची प्रतीक्षा आहे.भूखंड माफियांच्या अनेक प्रकरणांचा पर्दाफाश अद्याप बाकीभूखंड घोटाळ्यात पोलिसांची प्रगती सात गुन्ह्यांच्या पुढे होण्याची चिन्हे नाहीत. सात गुन्हे व १५ आरोपी, त्यातील दोघे पसार अशी या प्रकरणात पोलिसांची आतापर्यंतची प्रगती आहे. मात्र अद्याप पडद्यामागे असलेल्या प्रकरणांचा पर्दाफाश झाल्यानंतर नवे गुन्हे व त्यातील भूखंड माफियांच्या नव्या आरोपी चेहºयांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.