शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

सिंधीवाढोणा येथील जिजाबाईच्या मृत्यूची सखोल चौकशी करा

By admin | Updated: May 8, 2016 02:00 IST

झरी तालुक्याच्या सिंधीवाढोणा येथील जिजाबाई उईके या महिलेच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी,

घातपाताचा संशय : भावाचे मुकुटबन पोलिसांना निवेदन सादर यवतमाळ : झरी तालुक्याच्या सिंधीवाढोणा येथील जिजाबाई उईके या महिलेच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन माथार्जुन येथील तिच्या भावाने मुकुटबन पोलिसांना सादर केले आहे. वासुदेव खुदाराम सोयाम असे या भावाचे नाव आहे. त्यांनी मुकुटबन पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार २० मे २०१५ रोजी जिजाबाईला घेऊन तिचा पती धुळबा आत्माराम उईके हे मजुरांसह शेतात गेले होते. दुपारी १२ वाजता मजूर आणि धुळबा घरी परतले. परंतु जिजाबाई घरी आलीच नाही. ती बेपत्ता झाल्याचे नाटक धुळबा यांनी केल्याचा आरोप सोयाम यांनी केला आहे. जिजाबाईला सोडून धुळबा घरी आलाच कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जिजाबाई बेपत्ता झाल्यापासून अंत्यसंस्कारापर्यंत आपणास कोणताही निरोप दिला नाही, तिचा अंत्यसंस्कार रात्री २ वाजता का केला आणि मला व माझ्या कुटुंबियांना विश्वासात का घेतले गेले नाही, असा सवाल त्यांनी निवेदनात केला आहे. शेतीच्या हिस्सेवाटणीवरून जिजाबाई सोबत नेहमीच वाद होत होते. या वादातच जिजाबाईचा खून करून तिचा मृतदेह गावाशेजारी टाकला असावा, त्यात कुटुंबाचा हातभार असावा व नंतर तो मृतदेह पशुपक्षांनी तोडला असावा अशी शंकाही सोयाम यांनी वर्तविली आहे. जंगली जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे दाखवून शासनाकडून आठ लाख रुपयेसुद्धा वसूल केले गेले. ही शासनाची फसवणूक असल्याचा आरोप सोयाम यांनी केला आहे. जिजाबाईच्या मृत्यूची फेरतपासणी करण्यात यावी, असे निवेदन सोयाम यांनी ९ मार्च रोजी मुकुटबन ठाणेदाराला सादर केले. पोलीस अधीक्षक कार्यालयातही हे निवेदन केले गेले. या प्रकरणाचा तपास मंदगतीने सुरू आहे, संशयित मोकळे फिरत असल्याने मुकुटबन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर व प्रामाणिकपणावर साशंकता वाटत असल्याचेही सोयाम यांनी निवेदनात नमूद केले आहे.