शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जिल्ह्यात अडीच लाख वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

वन विभागाकडे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार वन लागवडीसाठी निधी देते. कॅम्पातून मिळालेला निधी तसेच जिल्हा नियोजन समितीने दिलेला निधी या आधारावरच २०२० या वर्षातील वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. त्यातही पुसद उपविभागात १८ ठिकाणी दोन लाख ४५ हजार ९४३ वृक्षांची लागवड केली.

ठळक मुद्देसर्वाधिक पुसदमध्ये : यवतमाळमध्ये १४ हजार हेक्टर तर पांढरकवडा झिरो

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन विभागाने यावर्षी शतकोटी वृक्ष लागवड योजना पैशाअभावी गुंडाळली आहे. केवळ कॅम्पा, जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतूनच वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. दोन लाख ६० हजार ७४९ वृक्षांची ४५० हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. यातही सर्वाधिक वृक्ष लागवड पुसद उपविभागात आहे.वृक्ष लागवड योजनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षात मोठा गाजावाजा व ईव्हेन्ट साजरा केला जात होता. २०१९ मध्ये लावलेल्या रोपांपैकी तब्बल ८५.५० टक्के रोपे जीवंत असल्याचा अहवाल वन विभागाने जाहीर केला आहे. प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे. तीन ते चार वर्षातील सरासरी जीवंत रोपाची संख्या ही एकूण लागवडीपेक्षा ४० टक्के असल्यास योजना शंभर टक्के यशस्वी झाल्याचे मानले जाते. युती सरकारच्या काळात भाजपचे वनमंत्री असताना वृक्ष लागवडीचा उत्सव साजरा केला. प्रत्यक्षात मात्र ही योजना किती यशस्वी ठरते याचा कधीही आढावा घेण्यात आला नाही. आता सरकार बदलले व कोरोना संसर्गामुळे सर्वत्रच आर्थिक मंदी पसरली आहे. याचा फटका वन विभागाच्या योजनांनाही बसला आहे. त्यामुळे वन विभागाने वृक्ष लागवडीला कात्री लावली आहे.वन विभागाकडे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार वन लागवडीसाठी निधी देते. कॅम्पातून मिळालेला निधी तसेच जिल्हा नियोजन समितीने दिलेला निधी या आधारावरच २०२० या वर्षातील वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. त्यातही पुसद उपविभागात १८ ठिकाणी दोन लाख ४५ हजार ९४३ वृक्षांची लागवड केली. यवतमाळ उपविभागात एका ठिकाणी १४ हजार ८०६ वृक्ष लागवड करण्यात आली. पांढरकवडा उपविभागात मात्र यावर्षी एकही वृक्ष लागवड झालेली नाही. वन विभाग यावर्षी पूर्णपणे वृक्ष व वनसंवर्धन, संरक्षणाच्या कामावर लक्ष देणार आहे. यामुळे जंगलातील तस्करीला आळा बसेल असे सांगण्यात येते.मागील तीन वर्षात लागवड झालेल्या वृक्षांचे जीवंत राहण्याची प्रमाण अतिशय चांगले आहे. २०१९ मध्ये लावलेल्या एकूण रोपापैकी ८५.५० टक्के रोपे सध्या जीवंत आहेत. वनसंवर्धन व संरक्षण यावरच यंत्रणेचा भर आहे. शासनाने सर्वच विभागाचे आर्थिक बजेट कमी केले आहे. याचा परिणाम काही प्रमाणात वन विभागाच्या योजनांवर होत आहे.- रवींद्र वानखडे,वनसंरक्षक, यवतमाळ

टॅग्स :environmentपर्यावरण