यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या यवतमाळ येथील बालाजी चौकातील कार्यालयात प्राप्तीकर विभागाच्या अधिका-यांकडून बुधवारी दुस-या दिवशीही चौकशी सुरुच होती. अतिरिक्त रोकड बाळगल्याप्रकरणी बाजोरिया यांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाची तपासणी सुरू झाली. ४० तास उलटून गेल्यानंतरही तपास सुरूच असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय कंत्राटदार सुमित बाजोरिया यांनी सर्व काही नियमानुसार असल्याचा दावा केला आहे.
बाजोरियांच्या कार्यालयात दुसऱ्या दिवशीही झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 05:24 IST