शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

यवतमाळात रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 5:00 AM

यवतमाळ शहरासह नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या आठही ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पार खिळखिळी झाली आहे. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे, कुठे पाईपलाईन उघडी पडलेली तर, अनेक भागात स्पिड बे्रकरचे काम रस्त्यांवरच्या नवनिर्मित नाल्या करत आहे. शहराचे हृदयस्थान असलेल्या दत्त चौकाकडे येणारे चारही मार्ग खाचखळग्यांनी व्यापलेले आहे.

ठळक मुद्देनगरपरिषदेचा कारभार : अमृत योजना, भूमिगत गटार योजनेच्या आडोशाने लपविले जातेय अपयश

यवतमाळ शहराच्या विकासात भर घालणाऱ्या चकचकीत रस्त्यांसोबत आता खाचखळग्यांनी भरलेले सर्वत्रच पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात या रस्त्यांमधून वेगोने गाडी चालविणे म्हणजे, अपघाताला निमंत्रण देण्याचाच प्रकार होय.गणेश उत्सवात अनेकांना गणरायाला विराजमान करण्यासाठी नेताना चांगलीच कसरत करावी लागली. या खड्ड्यांनी गणरायाला सुरक्षितरीत्या घरी नेता येणार की नाही, असा प्रश्न प्रत्येक भाविकांच्या मनात होता. गणारायाचे विसर्जन करतानाही खबरदारी घेत वाहन चालवावे लागणार आहे.यवतमाळ शहरासह नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या आठही ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पार खिळखिळी झाली आहे. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे, कुठे पाईपलाईन उघडी पडलेली तर, अनेक भागात स्पिड बे्रकरचे काम रस्त्यांवरच्या नवनिर्मित नाल्या करत आहे. शहराचे हृदयस्थान असलेल्या दत्त चौकाकडे येणारे चारही मार्ग खाचखळग्यांनी व्यापलेले आहे.तहसील चौक ते अवधुतवाडी पोलीस स्टेशन हा मार्ग प्रचंड रहदारीचा आहे. याठिकाणी रस्ता दुरुस्त करताना दोन कोट टाकण्यात आले. मात्र हा रस्ता गिट्टीसह जागोजागी उखडला आहे. काही ठिकाणी गज वर आले आहे. यामुळे भरधाव वाहन कुठल्याहीक्षणी पंक्चर होण्याची भीती आहे.उमरसरा परिसरात तीन फोटो चौकापर्यंत रस्ता चांगला आहे. मात्र आतमधील वस्त्या आणि पुढील रस्ता पूर्णत: उखडला आहे. हा रस्ता उताराचा आणि खड्ड्यांचा आहे. यामुळे वाहनचालकाचा तोल जाऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात याठिकाणच्या रस्त्याचा अंदाजच घेता येत नाही. खड्डे, उतार आणि वाहन घसरण्याची भीती या भागात आहे. नवख्या वाहनचालकांनी याठिकाणी गाडी चालविणे म्हणजे, दिव्यच आहे.लोहारा बायपासवरून वाघापूर मार्गे शहरात प्रवेश करताना मालवाहू गाड्यांची प्रचंड वर्दळ असते. यातून हा रस्ता पूर्णत: क्षतिग्रस्त झाला आहे. रेल्वे क्रॉसिंग आणि मधात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. यातच रस्ता रुंदीकरणाचेही काम सुरू आहे. अशा स्थितीत नजर चुकल्यास अपघात निश्चित आहे. गोदणी मार्गावर विविध ठिकाणी खाचखळगे पाहायला मिळतात.धामणगाव मार्गावर असलेल्या अंतर्गत वसाहतीमधील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. याठिकाणी जागोजागी मोठेमोठे खड्डे तयार झालेले आहेत. गिरिजा नगर आदी भागात असलेल्या मार्गावरील महाविद्यालयांमध्ये जाताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते.याशिवाय उमरसरा परिसरातील दहिवलकर ले-आऊट, न्यू गिलाणी नगर, राजानंद गडपायले मार्ग, वसंत ले-आऊट, जुना उमरसरा वार्ड -१, गोवर्धन ले-आऊट, शहरातील शिवाजी मैदान रोड, शिवाजी गार्डन, फडके हॉस्पिटलचा रस्ता, सारस्वत चौक, माईदे चौक, जाजू चौक, पाटीपुरा, अंबिकानगर या भागांमध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे.कृत्रिम टाक्यांचा मार्ग अडचणीचागणरायाच्या विसर्जनाकरिता शहरात नगरपरिषदेतर्फे २९ कृत्रिम टाक्यांची निर्मिती केली जाणार आहे. या ठिकाणावर पोहोचण्यासाठीचा मार्ग खाचखळग्यांचा आहे. यासाठी गणेश भक्तांना पायदळ जाण्याखेरीज पर्यायच नाही. यातून गणेश भक्तांमध्ये संतापाची लाट आहे.भूमिगत गटार आणि अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी करारानुसार कंत्राटदाराची आहे. याशिवाय शहरातील अनेक रस्ते निकृष्टरित्या बांधण्यात आले आहे. या कामाची चौकशी करावी, याविषयाची तक्रार आपण वरिष्ठांकडे केली आहे. यासंदर्भात लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.- कांचन बाळासाहेब चौधरी, नगराध्यक्ष, यवतमाळजीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनमुळे शहरातील रस्ते उखडले आहे. या संदर्भात सभागृहात विषय चर्चिला गेला. प्राधिकरणाकडून रस्त्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषद शहरातील काही रस्त्यांचे काम करणार आहे. त्यासाठी वर्क आॅर्डरही निघाल्या आहे. मात्र पावसाळा आणि कोरोनामुळे काम थांबले आहे.- मनिष दुबे, बांधकाम सभापती, नगरपरिषद, यवतमाळ

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक