शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नेर तालुक्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा हल्ला, पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा उपाय सुचविण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देशेतकरी हतबल । कीड नियंत्रणासाठीचे प्रयत्न असफल, पुन्हा ओढवले आर्थिक संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील कापसाचे पीक धोक्यात आले आहे. कृषी व कृषी संशोधन केंद्राच्या सुचविलेल्या उपाययोजनाही आता काम करत नाहीत. गुलाबी बोंडअळीने पुन्हा कापसाच्या बोंडात घर केले आहे. उभे कापसाचे पीक या बोंडअळी फस्त करीत आहेत. शेतकरी हतबल झाला आहे.टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा उपाय सुचविण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी या बोंडअळीच्या प्रकोपातून पीक वाचविण्यासाठी कृषी केंद्र चालकाच्या सल्ल्याने उपाययोजना केल्या. मात्र त्यात अपयश आले. आता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन गुलाबी बोंडअळीच्या संकटात शेतकऱ्यांना योग्य साथ द्यावी, अशी मागणी होत आहे. बोंडअळीमुळे कापसाचे संपूर्ण उत्पन्नच धोक्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत यांच्यास्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, कृषी अधीक्षकांना बोंडअळी नियंत्रणाच्यादृष्टीने सतर्क केले होते. नागपूरच्या कापूस व संशोधन केंद्रात शास्त्रज्ज्ञांनी गुलाबी बोंडअळीची विष पचविण्याची क्षमता १३८७ पट वाढल्याचे सांगितले होते. त्यानंतरही राज्यातील सर्व कृषी विद्यापीठ कापूस संशोधन केंद्र बोंडअळीचे संपूर्ण उच्चाटन करण्यात अपयशी ठरले. जेनेटिक इंजिनिअरिंग कंपनीने बीजी-३ ला परवानगी दिली नाही. त्यानंतरही नेरमध्ये बीजी-३ ची पेरणी झाली. एकंदरीत देशी वाणांचे बियाणे संपुष्टात आणण्यासाठी परकीय कंपन्यांनी बियाण्यावर अधिराज्य निर्माण केले आहे. गुलाबी अळीला जन्म देणाºया बियाण्यांची निर्मिती केली जात आहे. यामुळे शेतकºयांची दैनावस्था झाली आहे.कृषी विभागाची यंत्रणा सुस्तचनेर तालुक्यात बोंडअळीचा उद्रेक झाला असताना कृषी विभागाची यंत्रणा सुस्त आहे. बोंडअळी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नाही. या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस