शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी बोंड अळीने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 21:59 IST

शनिवार, २१ आॅक्टोबरच्या वादळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला. आता कपाशीवरील गुलाबी बोंड अळीमुळे हाताशी आलेले पीक पुरते हिरावले आहे.

ठळक मुद्देसंजय राठोड, माणिकराव ठाकरेंची भेट : मांगलादेवी परिसरात संकटांची मालिका

लोकमत न्यूज नेटवर्कमांगलादेवी : शनिवार, २१ आॅक्टोबरच्या वादळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला. आता कपाशीवरील गुलाबी बोंड अळीमुळे हाताशी आलेले पीक पुरते हिरावले आहे. प्रशासनाने अद्यापही सर्वेक्षण सुरू न केल्याने न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न मांगलादेवी व परिसरातील शेतकरी डबडबलेल्या नजरेने करीत आहेत. या ज्वलंत प्रश्नी नेते मंडळी केवळ शेताला भेट देऊन शेतकºयांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे सोपस्कार पार पाडत आहे.झाडाची हिरवी बोंडेही कीडीने पोखरली आहे. शेतकºयांनी आपली कैफियत जिल्हाधिकाºयांकडे मांडली. यानंतर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, देवानंद पवार यांनी शेतकºयांच्या शेतात जाऊन त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.रविवारी संजय राठोड यांनी कृषी संचालक, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, संबंधित बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधींसोबत मांगलादेवी येथील रामभाऊ दहापुते यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांना संपूर्ण शेतच बोंड अळीने फस्त केलेले दिसले. दहापुते यांना मागच्यावर्षी याच शेतात ५८ क्विंटल कापूस झाला होता. यंदा मात्र एक क्विंटलही कापूस होणार नाही, कर्ज काढून शेती केली, परंतु बोंड अळीने पुरता बर्बाद झालो, असे त्यांनी डोळ्यात आसवे आणत राज्यमंत्र्यांना सांगितले. अशीच परिस्थिती मांगलादेवी व परिसरातील शेतकºयांची आहे. यावेळी ना. राठोड यांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे लेखी तक्रार दाखल करण्याचे आवाहन शेतकºयांना केले. बीटी कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.