शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर गुलाबी बोंडअळीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:59 IST

यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

ठळक मुद्देआक्रमणाची भीती कपाशीचा पेरा दहा टक्क्याने घटण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.गेल्या खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले होते. या अळीने कपाशीचे संपूर्ण बोंडच पोखरले. अळीचे आक्रमण परतवून लावताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जहाल कीटकनाशकांची फवारणी केली. त्याची विषबाधा होऊन राज्यात ६२ शेतकरी-शेतमजुरांचा बळी गेला. त्यात सर्वाधिक संख्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात नोंदविली गेली आहे. ही बोंडअळी यावर्षीसुद्धा कॉटन बेल्टमध्ये आक्रमण करण्याची भीती कृषी विभागाला आहे. त्यामुळेच बियाणे खरेदी करताना शेतकऱ्याला कृषी केंद्र चालकांकडून सतर्क केले जात आहे. तर कृषी खात्याची यंत्रणा बियाणे विक्रेत्यांना सतर्क करताना दिसते आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रकोप गेल्या वर्षी केवळ महाराष्ट्रतील कापूस उत्पादक जिल्ह्यांपुरताच मर्यादित नव्हता तर लगतच्या तेलंगणा, मध्यप्रदेश व गुजरातमध्येही आक्रमण केले होते.

साडेपाच हजारांच्या भावाची अपेक्षादेशात सरसकट दहा टक्के पेरा कमी होण्याचा अंदाज असल्याने पुढच्या वर्षी कपाशीला साडेपाच हजारांपेक्षा अधिक भाव राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुजरातला सध्याही चांगल्या कापसाला ६१०० प्रति क्ंिवटल भाव दिला जात आहे. सरकी व ढेपेची मागणी अधिक असल्याचा हा परिणाम मानला जातो. तेथे रुईगाठीलासुद्धा ५०० रुपये अधिकचा भाव मिळतो.

रूईगाठींच्या साठ्यात सर्वाधिक घटएकीकडे कपाशीचा पेरा घटतो आहे तर दुसरीकडे रूईगाठींच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होते आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने रूईगाठींच्या साठ्यात घट झाल्याचे सांगितले जाते. सध्या केवळ १६ लाख रूईगाठी शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. रूईगाठींना बाजारात सध्या ४७ हजारांचा भाव आहे. पुढच्या वर्षी तो ५४ हजार राहण्याची अपेक्षा आहे. महिनाभरातच हा भाव ५० हजारांवर व आॅक्टोबरनंतर ५४ हजारापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.गुलाबी बोंडअळी ओळखणे कठीणसामान्य शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी कठीण जाते. सतत शेतीच्या संपर्कात असलेल्या तज्ज्ञ शेतकऱ्यालाच हे आक्रमण ओळखता येते. गावात अशा शेतकऱ्यांची संख्या अवघी दोन ते तीन राहते. बोंडाच्या खालून शिरकाव होत असल्याने संपूर्ण बोंड पोखरल्यावरच अळीचे आक्रमण दृष्टीस पडते, हे विशेष.

टॅग्स :agricultureशेती