शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

पिंपळखुटी रॅक पॉईंटचे लोकार्पण

By admin | Updated: May 29, 2015 00:14 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक आणि स्वस्त दरात रासायनीक खते उपलब्ध होण्यासाठी कायर आणि पिंपळखूटी या रॅक पॉईंटची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती.

यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक आणि स्वस्त दरात रासायनीक खते उपलब्ध होण्यासाठी कायर आणि पिंपळखूटी या रॅक पॉईंटची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यापैकी पिंपळखूटी रॅक पॉईंटचे बुधवारी केंद्रीय रसायने व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या रॅक पॉईटमुळे शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध होईल असे, ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार राजु तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पांढरकवडा पंचायत समिती सभापती मल्लारेड्डी पाणजवार, पिंपळखुटीचे सरपंच स्वामी कोरेड्डीवार, उपसरपंच लक्ष्मण्णा कोरेड्डीवार उपस्थित होते.पिंपळखुटीच्या रॅक पॉईंटवर राष्ट्रीय केमीकल अ‍ॅन्ड फर्टीलायझर कंपनीचे खत घेऊन आलेली पहिली खताची मालवाहू रेल्वे (रॅक) दाखल झाली. रॅक दाखल झाल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याहस्ते फित कापून शुभारंभ तसेच पुजन करण्यात आले. तसेच रॅकमधून भरण्यात आलेल्या पहिल्या ट्रकला झेंडी दाखवून तो रवाना करण्यात आला. जिल्ह्यात यापूर्वी धामणगाव किंवा अन्य ठिकाणाहून खते आणावे लागत असल्याने त्याची किंमत वाढत होती. शिवाय वेळेवर आणि मुबलक खत शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकत नव्हते. पिंपळखुटी पॉईंटमुळे आता अडचण जाणार नसल्याचे ना.अहीर म्हणाले. इफको, नागार्जून यासह अन्य नामांकीत कंपन्यांची खतेही या रॅकपॉईंटवर लवकरच उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे. खतांसोबतच सिंचन, वीज, शेतमालास योग्य भाव, एकापेक्षा जास्त पिके घेण्याची सुविधा तसेच कापसावर आधारीत प्रक्र्रिया उद्योग उभारणीवर भर आहे. देशाच्या विकासात मोलाचा हातभार असलेल्या शेतकऱ्यास चांगल्या दर्जाचे बियाणे, किटकनाशके उपलब्ध करूण देण्यात येत असल्याचेही ना. अहीर यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)